सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांची उभारणी

Posted On: 05 AUG 2021 4:33PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2021

 

लघू , सूक्ष्म आणि मध्यम उद्योगाच्या क्षेत्रात खाजगी उद्योजक असून या क्षेत्रातील गुंतवणूक उद्योजकांकडून केली जाते. देशातील सूक्ष्म , लघु, मध्यम उद्योगांची उभारणी  सूक्ष्म , लघु, मध्यम उद्योग मंत्रालयाकडून केली जात नाही. या उद्योगांना प्रोत्साहन व त्यांचा विकास हे राज्यांच्या अख्यतारीतील बाब असते. परंतु, देशातील  सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी, त्यांचा विकास व त्यांच्यातील स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी राज्ये व केंद्रशासित प्रदेश करत असलेल्या प्रयत्नांना विविध योजना, कार्यक्रम तसेच धोरणात्मक पुढाकाराने केंद्र सरकार पाठिंबा देते.

लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योगांना पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP), ग्रामीण रोजगार निर्मिती कार्यक्रम (REGP),सूक्ष्म घटक विकास आणि पुनर्निधी एजन्सी (MUDRA), क्रेडीट लिंक्ड कॅपिटल सबसिडी फॉर टेक्नॉलॉजी अपग्रेडेशन स्किम(CLCS-TUS), खादी ग्राम आणि कॉयर उद्योग, आंतरराष्ट्रीय सहकार्य योजना, खरेदी व विपणन सहाय्य योजना, सुक्ष्म व लघु उद्योगांसाठी कर्ज हमी निधी योजना यासारख्या योजनांचा लाभ घेता येतो.

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज लोकसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली.

S.Tupe/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1742780) Visitor Counter : 832