नागरी उड्डाण मंत्रालय
हवाई वाहतूक क्षेत्रातील सुधारणा
येत्या 4-5 वर्षांमध्ये हवाई वाहतूक क्षेत्रातील वाढ व विकासासाठी 25000 कोटी खर्च करण्यात येणार
देशभरात 21 हरित विमानतळांना तत्वतः मान्यता
Posted On:
04 AUG 2021 6:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2021
नागरी हवाई उड्डाण क्षेत्रात सर्वोत्कृष्ट पायाभूत सुविधा व इतर सोयीच्या माध्यमातून या क्षेत्राचा कायापालट करण्याच्या हेतूने सरकारने अनेक उपाययोजना केल्या आहेत.
- विकासाचे लक्ष्य गाठण्याच्या उद्देशाने सध्यांच्या विमानतळांचा विस्तार आणि सुधारणा, नवीन विमानतळांची उभारणी, सध्याच्या धावपट्टयांचा विस्तार वा सुधार त्यांचप्रमाणे एप्रॉन्स, हवाईतळ दिशादर्शक सेवा(ANS), कन्ट्रोल टॉवर्स, तांत्रिक ब्लॉक्स अश्या हवाईवाहतूकीशी संबधित घटकांमध्ये सुधारणा करण्यासाठी पुढील चार पाच वर्षांमध्ये 25,000 कोटी रुपये खर्चाच्या अनेक विकासयोजना भारतीय विमानतळ विकास प्राधिकरणाने हाती घेतल्या आहेत.
- देशभरात 21 हरितपट्ट्यातील हवाईतळ उभारण्यास केंद्रसरकारने तत्वतः मान्यता दिली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात शिर्डी, पश्चिम बंगालमध्ये दुर्गापूर, सिक्कीममधील पैकॉंग, केरळमध्ये कुन्नुर, आंध्रप्रदेशात ओर्वाकल व कर्नाटकात कलबुर्गी या सहा ठिकाणी असे हरितपट्ट्यातील विमानतळ कार्यान्वित झाले आहेत.
- सध्याच्या व नवीन विमानतळांसाठी खाजगी-सरकारी भागीदारी तत्वावर खाजगी गुंतवणूकीला प्रोत्साहन
- विभागीय जोडणी योजना (रिजनल कनेक्टिविटी स्किम (RCS)) च्या उडे देश का आम नागरीक म्हणजेच उडान योजनेअंतर्गत 27 जुलै 2021 रोजी 359 हवाईमार्ग सुरु करण्यात आले. या मार्गांनी दोन वॉटर एअरोड्रोम व 5 हेलिकॉप्टरसहित, 59 फारशे वापरात नसलेले वा अजिबात वापरात नसलेले हवाईतळ वापरात आणले गेले.
- योग्य हवाईमार्ग व्यवस्थापन, छोटे हवाईमार्ग व कमी इंधनवापर हे साध्य करण्यासाठी भारतीय हवाईहद्दीतील हवाईमार्ग हे भारतीय हवाईदलाच्या समन्वयाने काढले जातात.
- एअर बबल व्यवस्थापनाच्या मदतीने, आंतरराष्ट्रीय क्षेत्रात आपल्या हवाई वाहतूक कंपन्यांना सुगोग्य व बरोबरीची वागणूक मिळवण्यासाठी प्रयत्न
- विविध धोरणात्मक योजनांद्वारे देशातील हवाई वाहतूक कंपन्यांमध्ये जागतिक दर्ज्याची स्पर्धात्मकता आणण्यासाठी सरकारचे सहकार्य
- आधुनिक आरामदायक विमाने विकत घेण्यासाठी कंपन्यांना सरकारचे सहाय्य, विस्तारा हवाईवाहतूक कंपनीने दोन भव्य विमाने घेतली.
हवाईवाहतूक मंत्रालयाचे राज्यमंत्री वि.के.सिंग यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली.
* * *
S.Tupe/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1742427)