राष्ट्रपती कार्यालय

मद्रास विधान परिषदेने संपूर्ण प्रातिनिधिक लोकशाही व्यवस्थेची बीजे पेरली जी स्वातंत्र्यानंतर साकार झाली: राष्ट्रपती कोविंद

चेन्नई येथे मद्रास विधान परिषदेच्या शतकपूर्तीनिमित्त आयोजित समारंभाला राष्ट्रपतींची उपस्थिती

Posted On: 02 AUG 2021 9:32PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 ऑगस्‍ट 2021 


मद्रास विधान परिषदेने संपूर्ण प्रातिनिधिक लोकशाही स्वरूपाच्या प्रशासनाची बीजे पेरली  जी स्वातंत्र्यानंतर साकार झाली असे राष्ट्रपती राम नाथ कोविंद म्हणाले. ते आज (2 ऑगस्ट, 2021) चेन्नई येथे मद्रास विधान परिषदेच्या शतकपूर्तीनिमित्त आयोजित समारंभात  बोलत होते. यावेळी त्यांनी तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री डॉ. कलाईगनार एम. करुणानिधि यांच्या तैलचित्राचे अनावरण केले.

राष्ट्रपती म्हणाले की मद्रास विधान परिषदेने अनेक दूरगामी कायदे केले आणि सुरुवातीच्या दशकात अनेक बदलही  केले. लोकशाहीची भावना राज्य विधानमंडळाचा दीपस्तंभ राहिली आहे. समाजातील दुर्बल घटकांना सशक्त करण्यासाठी आणि लोकशाही बळकट करण्यासाठी देशभरात नंतरच्या काळात करण्यात आलेल्या अनेक पुरोगामी कायद्यांचा पाया या विधीमंडळाने रचला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही . गरीबांचे उत्थान करण्यासाठी आणि सामाजिक दुष्ट प्रवृत्ती दूर करण्यासाठी प्रशासनावर लक्ष केंद्रित करून लोकशाहीची मुळे जोपासण्याचे श्रेय या विधिमंडळाला देता येईल.  या प्रदेशातील राजकारण आणि प्रशासन सकारात्मक आणि तर्कशुद्ध सामग्रीच्या भोवती विकसित झाले ज्यात वंचितांचे कल्याण हे उद्दिष्ट होते. देवदासी प्रथा रद्द करणे, विधवा पुनर्विवाह, शाळांमध्ये मध्यान्ह भोजन आणि भूमिहीनांना शेतजमिनीचे वितरण या क्रांतिकारी कल्पनांनी समाजात परिवर्तन घडवले.  इथे कुणाचेही राज्य असो, कल्याणकारी राज्याची संकल्पना या विधिमंडळात  खोलवर रुजलेली आहे.

 

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री डॉ. कलाईगनार एम. करुणानिधि  यांचे स्मरण करत राष्ट्रपती म्हणाले की, ' कलाईगनार'  यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात अगदी किशोरवयातच केली होती, जेव्हा भारत स्वातंत्र्यासाठी लढत होता आणि त्यांनी अलिकडेच आपला निरोप घेतला. आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी दलित लोकांसाठी काम करण्यास सुरुवात केली होती, तेव्हा भारत बेड्यांमध्ये बंदिस्त होता. परकीय राजवटीखाली दीर्घकाळ शोषण सुरु होते, गरीबी  आणि निरक्षरतेने त्रस्त होता.  जेव्हा त्यांनी शेवटचा श्वास घेतला, तेव्हा त्यांना समाधान वाटले असेल  की या भूमीने आणि इथल्या  लोकांनी सर्व आघाड्यांवर आश्चर्यकारक प्रगती आणि विकास केला आहे.

राष्ट्रपतींच्या संपूर्ण भाषणासाठी कृपया येथे क्लिक करा

 
* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1741681) Visitor Counter : 57


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi