राष्ट्रपती कार्यालय
मद्रास विधान परिषदेच्या 100 व्या वर्षानिमित्त उद्या राष्ट्रपतींची उपस्थिती आणि चेन्नई येथे डॉ. कलाइनर एम. करुणानिधी यांच्या तैलचित्राचे त्यांच्या हस्ते अनावरण
प्रविष्टि तिथि:
01 AUG 2021 7:15PM by PIB Mumbai
मद्रास विधान परिषदेच्या 100 व्या वर्षानिमित्त उद्या (2 ऑगस्ट 2021) चेन्नई येथे राष्ट्रपती राम नाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत आणि समारंभास संबोधित करणार आहेत. तसेच त्यांचा हस्ते तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री डॉ कलाइनर एम. करुणानिधी यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे.
तामिळनाडू मधील त्यांच्या वास्तव्यात (2 ऑगस्ट ते 6 ऑगस्ट 2021), राष्ट्रपती 4 ऑगस्ट रोजी वेलिंग्टन येथील संरक्षण सेवा कर्मचारी महाविद्यालयास भेट देतील आणि 77 स्टाफ कोर्सच्या विद्यार्थ्यांना संबोधित करतील.
***
S.Thakur/S.Shaikh/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1741292)
आगंतुक पटल : 309