अर्थ मंत्रालय

आर्थिक वर्ष 2021-22 साठी जून 2021 पर्यंत भारत सरकारच्या जमाखर्चाचा मासिक आढावा

Posted On: 30 JUL 2021 6:50PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 जुलै 2021

जून 2021 पर्यंत केंद्र सरकारचे मासिक जमाखर्च  एकत्रित करण्यात आले असून  अहवाल प्रकाशित करण्यात आले आहेत. याचे ठळक मुद्दे खालीलप्रमाणे  आहेतः

भारत सरकारला  जून 2021 पर्यंत 5,47,399 कोटी रुपये (एकूण प्राप्तीच्या संबंधित अर्थसंकल्पीय अंदाजाच्या  27.7%)  प्राप्त झाले. यात  4,12,680 कोटी रुपये  कर महसुलाचे  (निव्वळ केंद्राचा ), बिगर  कर महसुलाचे  1,27,317 कोटी रुपये आणि रु. 7,402 कोटी रुपये बिगर कर्ज भांडवलाचा समावेश आहे. बिगर कर्ज भांडवल प्राप्तीमध्ये  3,406 कोटी रुपये कर्ज वसुलीचा आणि 3,996 कोटी.रुपये निर्गुंतवणुकीचा समावेश आहे.

या कालावधीपर्यंत 1,17,524 कोटी रुपये भारत सरकारद्वारे करांच्या हिश्श्याचे  वितरण म्हणून राज्य सरकारांना हस्तांतरित करण्यात आले आहेत.

भारत सरकारचा  एकूण खर्च  8,21,644 कोटी रुपये (संबंधित अर्थसंकल्पीय खर्च 2021-22 च्या  23.6%), त्यापैकी रु. 7,10,148 कोटी रुपये महसुली खर्चाचे  आणि  1,11,496 कोटी रुपये भांडवली खर्चाचे आहेत. एकूण महसूली  खर्चापैकी 1,84,295 कोटी रुपये व्याज देय आणि  1,00,090 कोटी रुपये मुख्य अनुदानाचे आहेत.

 

 

 

 M.Chopade/S.Chavan/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1740836) Visitor Counter : 172


Read this release in: English , Urdu , Punjabi , Tamil