PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
29 JUL 2021 5:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई 29 जुलै 2021


- 45.07 Cr. Vaccine Doses administered so far under Nationwide Vaccination Drive
- 3,07,01,612 total recoveries across the country so far
- Recovery Rate currently at 97.38%
- 38,465 patients recovered during last 24 hours
- India reports 43,509 new cases in last 24 hours
- India's Active caseload currently 4,03,840
- Active cases constitute 1.28% of total cases
- Weekly Positivity Rate remains below 5%, currently at 2.38%
- Daily positivity rate at 2.52%, remains below 5%
- Testing capacity substantially ramped up – 46.26 cr tests conducted(Total)
|
#Unite2FightCorona#IndiaFightsCorona
PRESS INFORMATION BUREAU
MINISTRY OF INFORMATION & BROADCASTING
GOVERNMENT OF INDIA



आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती
भारतातील कोविड – 19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने काल 45 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आज सकाळी आठ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालानुसार, एकूण 54,11,501 सत्रांमध्ये 45,07,06,257 लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासात 43,92,697 लसीच्या मात्रा देण्यात आल्या.
|
HCWs
|
1st Dose
|
1,02,96,166
|
|
2nd Dose
|
77,71,787
|
|
FLWs
|
1st Dose
|
1,79,14,176
|
|
2nd Dose
|
1,10,81,579
|
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
14,68,84,314
|
|
2nd Dose
|
72,09,744
|
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
10,30,99,861
|
|
2nd Dose
|
3,68,42,675
|
|
Over 60 years
|
1st Dose
|
7,43,50,754
|
|
2nd Dose
|
3,52,55,201
|
|
Total
|
45,07,06,257
|
21 जून 2021 पासून कोविड - 19 सार्वत्रिक लसीकरणाचा नवा टप्पा सुरू झाला आहे. देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे.
महामारीच्या प्रारंभीच्या काळापासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 3,07,01,612 जण पूर्वीच बरे झाले आहेत आणि 38,465 रुग्ण गेल्या 24 तासात बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर 97.38 % इतका आहे.

गेल्या 24 तासात 43,509 नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली आहे.
सलग 32 दिवस 50,000 पेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद होत असून केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्रशासित प्रदेश यांच्या एकत्रित प्रयत्नांचा हा परिणाम आहे.

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या आज 4,03,840 आहे आणि देशातील पॉझिटिव्ह रुग्णसंख्येच्या ती 1.28% इतकी आहे.

चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ करीत, देशभरात गेल्या 24 तासात 17,28,795 चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत भारताने 46 कोटींपेक्षा अधिक (46,26,29,773) चाचण्या केल्या आहेत.
एकीकडे देशभरात चाचणी क्षमतेत वाढ करण्यात आली आहे, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 2.38% आणि दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर आज 2.52% आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर सलग 52 व्या दिवशी 5% पेक्षा कमी आहे.
इतर अपडेटस्
- सर्व स्रोतांच्या माध्यमातून केंद्र सरकारने आतापर्यंत 47.48 कोटींपेक्षा जास्त (47,48,77,490) लसींच्या मात्रा राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना पुरविल्या आहेत आणि आणखी 53,05,260 मात्रा पुरवठ्याच्या मार्गावर आहेत.
आज सकाळी आठ वाजेपर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, वाया गेलेल्या मात्रांसह एकूण 44,74,97,240 मात्रा देण्यात आल्या आहेत.
याशिवाय लसीच्या 2.88 कोटीपेक्षा जास्त (2,88,55,050) शिल्लक आणि न वापरलेल्या मात्रा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि खासगी रुग्णालयांकडे उपलब्ध आहेत.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वाखाली, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एक ऐतिहासिक आणि दूरगामी निर्णय घेतला आहे. यानुसार, देशात सर्व वैद्यकीय/दंतवैद्यकीय पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेशासाठी(एमबीबीएस/एमडी/एमएस/पदविका/बीडीएस/एमडीएस) मध्ये अखिल भारतीय कोटा(AIQ) योजनेअंतर्गत इतर मागासवर्गीयांना 27 % आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना 10 % आरक्षण दिले जाणार आहे. चालू म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2021-22 पासूनच हा निर्णय लागू होणार आहे.
- राष्ट्रीय निसर्गोपचार संस्था (NIN) पुणे,ने देखील हे स्पष्टपणे म्हटले आहे की NICE ने काही मोठे आणि दिशाभूल करणारे दावे केले आहेत. कोविड उपचार/ व्यवस्थापणाविषयी प्रोटोकॉल तयार असून त्याला आयुषची मान्यता असल्याचा दावा त्यांनी केला आहे. इथे हे ही नमूद करायला हवे की, एनआयएन, पुणे ही आयुष मंत्रालयाअंतर्गत कार्यरत संस्था असून, कोविड प्रतिबंध/उपचार/ व्यवस्थापनाबाबत आयुष मंत्रालयाने निश्चित केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे ही संस्था काटेकोरपणे पालन करते, एवढेच नाही, तर या मार्गदर्शक तत्त्वांचा प्रसार-प्रचारही करते.
Important Tweets
***
M.Chopade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1740475)
Visitor Counter : 175