शिक्षण मंत्रालय

दिव्यांग मुलांसाठी डिजिटल शिक्षणाचे स्त्रोत

Posted On: 29 JUL 2021 6:19PM by PIB Mumbai

 

दिव्यांगत्व असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी डिजिटल स्त्रोतांची निर्मिती करताना उपयुक्त ठरणाऱ्या दिव्यांग मुलांसाठी ई-साहित्य विकसित करताना पाळावयाच्या मार्गदर्शक सूचना 8 जून 2021 ला जारी करण्यात आल्या असून त्या पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहेत: https://www.education.gov.in/sites/upload_files/mhrd/files/CWSN_E-Content_guidelines.pdf

या मार्गदर्शक सूचनांच्या माध्यमातून खालील सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत:

शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांच्या शिक्षणविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी सार्वत्रिक शिक्षण संरचनेतील तत्वांवर आधारित आणि सहजतेने उपलब्ध होणारी डिजिटल पाठ्यपुस्तके

कानाने ऐकू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुणांच्या भाषेतील व्हिडिओ, आणि                                              

पुरवणी ई-साहित्य यामध्ये वरील 1 आणि 2 क्रमांकात वर्णन केलेले शिक्षण साहित्य वगळता आणखी इतर प्रकारचे  ई-साहित्य

दैनंदिन जीवनातील व्यक्तिगत पातळीवर पुरेशी ठरतील अशा कौशल्यांच्या शिक्षणावर मुखत्वे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे कारण त्यामुळे या दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांची संवाद आणि भाषा विकसित करणे वा सुधारणे, साक्षरता आणि साधी गणितीय कौशल्ये यांचा विकास, स्वतःच्या गरजा आणि भावना समजण्यासाठी तसेच इतर संज्ञानात्मक कार्यांसाठी स्व-जाणीवेचे विकसन, व्यावसायिक आणि रोजगाराशी संबंधित कौशल्ये, आवडीची कार्ये आणि छंद विकसित करणे इत्यादींसाठी खूप फायदा होणार आहे.

आत्मनिर्भर भारत कार्यक्रमाचा भाग असलेल्या पंतप्रधान ई-विद्या कार्यक्रम या 17 मे 2020 ला सुरु करण्यात आलेल्या सर्वसमावेशक उपक्रमामधून बहुविध पद्धतीने शिक्षण घेण्याच्या सर्व पद्धतींमध्ये  सुसंगती आणणे शक्य व्हावे म्हणून डिजिटल तसेच रेडियोद्वारे प्रसारित होऊ शकणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमांचे एकत्रीकरण करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. या उपक्रमामुळे दृष्टी आणि श्रवण शक्तींबाबत दिव्यांग असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष ई-साहित्य विकसित करण्यासोबतच रेडियो, कम्युनिटी रेडियो आणि पॉडकास्ट यांचा अधिकाधिक वापर तसेच दीक्षा पोर्टलवर क्यूआर कोड अर्थात जलद प्रतिसाद देणारे सांकेतिक कोड असलेली इयत्ता पहिली ते बारावी ची डिजिटल स्वरूपातील पाठ्यपुस्तके अपलोड करणे सहज शक्य होणार आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राज्यसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.

***

Jaydevi PS/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1740397) Visitor Counter : 198


Read this release in: English , Urdu , Punjabi , Telugu