नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
ग्रीडशी संलग्न असलेल्या छतावरच्या सौर प्रणालीला केंद्र सरकारचे प्रोत्साहन
Posted On:
28 JUL 2021 4:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जुलै 2021
ग्रामीण भागासह देशात छतावरच्या सौर प्रणालीला प्रोत्साहन देण्यासाठी नविकरणीय उर्जा मंत्रालय छतावर सौर कार्यक्रमाचा II टप्पा राबवत आहे. या अंतर्गत 2022 पर्यंत निवासी भागात, अनुदानाच्या तरतुदीसह 4000 मेगावॅट स्थापनेचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. वैयक्तिक कुटुंबासाठी 3 किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या छतावरच्या सौर प्रणालीसाठी प्रमाण खर्चाच्या 40% अनुदान तर 3 च्या पुढे 10 किलोवॅट पर्यंत क्षमतेच्या छतावरच्या सौर प्रणालीसाठी प्रमाण खर्चाच्या 20% अनुदान पुरवण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय उर्जा आणि नविकरणीय उर्जा मंत्री आर के सिंह यांनी काल राज्य सभेत लेखी उत्तरात दिली. गट गृहनिर्माण संस्था/निवासी कल्याण संघटना (जीएचएस/ आरडब्ल्यूए) साठी, सामायिक सुविधांसाठी उर्जा पुरवण्याकरिता 500 किलोवॅटपर्यंत क्षमतेच्या छतावरच्या सौर प्रणालीसाठी प्रमाण खर्चाच्या 20% अनुदान आहे.
देशात ग्रीडशी संलग्न असलेल्या छतावरच्या सौर प्रणालीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या महत्वाच्या उपाययोजना याप्रमाणे आहेत-
- छतावरच्या सौर कार्यक्रमाचा II टप्पा सुरु करण्यात आला असून या अंतर्गत निवासी क्षेत्रासाठी केंद्रीय वित्तीय सहाय्य आणि उर्जा वितरण कंपन्या, डीसकॉमसाठी गेल्या वर्षीच्या स्थापित क्षमतेच्या तुलनेत अतिरिक्त क्षमता साध्य केल्यास प्रोत्साहन
- याआधी I टप्यामध्ये निवासी/संस्थात्मक/सामाजिक क्षेत्रासाठी केंद्रीय वित्तीय सहाय्य आणि सरकारी क्षेत्रासाठी कामगिरी संलग्न प्रोत्साहन पुरवण्यात येत होते.
- ऑनलाईन पोर्टल एकीकृत करण्यासाठी आणि विकास करण्यासाठी तसेच छतावरच्या सौर प्रकल्पांसाठी राज्यांना सहाय्य
- प्राधान्य क्षेत्र कर्ज यामध्ये नविकरणीय उर्जेचा समावेश
- छतावरच्या सौर प्रकल्पांसाठी कल्पक व्यापारी मॉडेल राज्यांसमवेत सामायिक
- मुद्रित आणि इलेक्ट्रोनिक माध्यमांद्वारे माहिती प्रसारण आणि जनजागृती
S.Tupe/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1739910)
Visitor Counter : 265