युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

टार्गेट ऑलिंपिक पोडियम स्कीम व राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणाच्या योजनेंतर्गत वर्ष 2018-19 ते आतापर्यंत साधारणतः 765 कोटी रुपयांचा खर्च :-  केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर

Posted On: 26 JUL 2021 7:53PM by PIB Mumbai

 

 

ठळक मुद्दे

  • कोविड19 च्या दुसऱ्या लाटेत अनेक खेळाडूंना परदेशात प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले.
  • राज्यांना क्रीडासंबधीत विशेष व इतर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी खेलो इंडीया योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य
  • खेलो इंडिया अंतर्गत राज्य सर्वोत्कृष्टता केंद्र (SLKISCE) उभारण्यासाठी राज्यांना/केंद्रशासित प्रदेशांना आर्थिक सहाय्य. ही केंद्रे कार्यरत.

ऑलिंपिकसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठीची पूर्वतयारी ही सातत्याने सुरू राहणारी प्रक्रिया आहे. टोकियो-2020 च्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकणाऱ्या भारतीय पथकाच्या  तयारी करून घेण्यासाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना केली गेली होती. कोविड19 च्या दुसऱ्या लाटेत अनेक खेळाडूंना देशातील महामारीच्या संसर्गापासून दूर राखण्याच्या हेतूने परदेशात प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सहभाग होण्याचा संभव असणाऱ्या इतर खेळाडूंना सामाजिक अंतराचे नियम पाळत घेतल्या जाणाऱ्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले.

ऑलिंपिकसह आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धांसाठी तयारी करणाऱ्या खेळाडूंचे प्रशिक्षण व स्पर्धात्मक तयारीसाठी निधीची व्यवस्था राष्ट्रीय क्रीडा फेडरेशन्सच्या सहाय्यासाठी राखून ठेवलेल्या निधीतून करण्यात येतो. तर पदक मिळवण्याच्या दिशेने विशेष प्रशिक्षण हे राष्ट्रीय क्रीडा विकास निधीच्या कक्षेतील टारगेट ऑलिंपिक पोडियम स्किम (TOPS) योजनेंतर्गत दिले जाते.

वर्ष 2018-19 पासून आतापर्यंत टॉप्सअंतर्गत एकूण खर्च 54.26 कोटी आणि राष्ट्रीय क्रीडा फेडरेशन्सच्या सहाय्यक योजनेचा एकूण खर्च 711.46 झाला आहे.

भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या केंद्रांमध्ये पुरेशा योग्य सुविधा असल्यामुळे  ऑलिंपिकसारख्या महत्वपूर्ण आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी तयारी करणाऱ्या खेळाडूंना प्रामुख्याने या केंद्रांमध्ये प्रशिक्षण देण्यात येते. याशिवाय राज्यांमधील क्रीडासंबधी सुविधा सुधारण्यासाठी प्रत्येक राज्यामध्ये  खेलो इंडिया अंतर्गत राज्य सर्वोत्कृष्टता केंद्र (Khelo India State Centre of Excellence -SLKISCE) घोषित करून त्यात सर्वोत्तम क्रीडा सुविधा देण्याची परवानगी देण्यात आली. त्यासाठी मनुष्यबळ व क्रीडासुविधांचा स्तर उंचावण्यासाठी लागणाऱ्या निधीची व्यवस्था करण्यात आली. देशभरात अश्या 24 SLKISCEs आधीच सुरू झाल्या आहेत.

केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी राज्यसभेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली.

***

M.Chopade/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1739207) Visitor Counter : 193