पोलाद मंत्रालय

प्रक्रिया केलेल्या पोलादाच्या वापरात देशांतर्गत उत्पादनाचा टक्का वाढला


वर्ष 2019-20 पासून भारतात, प्रक्रिया केलेल्या पोलादाच्या निर्यातीचे प्रमाण आयातीपेक्षा जास्त

Posted On: 26 JUL 2021 5:50PM by PIB Mumbai

 

प्रक्रिया केलेल्या पोलादाचे देशांतर्गत उत्पादन तसेच वापर व आयात केलेल्या पोलादाचा वापर यांचे गेल्या तीन वर्षातील तसेच आताचे आकडे यावरून प्रक्रिया केलेल्या पोलादाच्या वापरात देशांतर्गत उत्पादनाचा टक्का वाढत असल्याचे दिसून येते.

 

Finished Steel (in million tonnes)

Year

Consumption

Production

Import

% Share of Import in consumption

% Share of Domestic Production in Consumption

2018-19

98.71

101.29

7.84

7.9

92.1

2019-20

100.17

102.62

6.77

6.8

93.2

2020-21

94.89

96.20

4.75

5.0

95.0

April-June, 2021*

24.85

26.23

1.16

4.7

95.3

Source: JPC; *provisional

प्रक्रिया केलेल्या पोलादाचे गेल्या तीन वर्षातील आयात निर्यातीचे आकडे आणि आताच्या वर्षातील आकडे पुढे दिले आहेत. त्यावरून 2019-20 पासून भारत प्रक्रिया केलेल्या पोलादाचा निव्वळ निर्यातदार असल्याचे लक्षात येईल.

 

Year

Finished Steel (in million tonnes)

Import

Export

2018-19

7.84

6.36

2019-20

6.77

8.36

2020-21

4.75

10.78

April- June, 2021*

1.16

3.56

Source: JPC; *provisional

प्रक्रिया केलेल्या पोलादाला असलेली देशातील मागणी, देशांतर्गत पोलाद उद्योगांमुळे भागत आहे, आणि गेल्या तीन वर्षात आयात हळूहळू कमी होत आहेत, ही माहिती केंद्रीय पोलाद मंत्री रामचंद्र प्रसाद सिंग यांनी आज लोकसभेत लेखी उत्तराद्वारे दिली.

***

S.Tupe/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1739148) Visitor Counter : 209


Read this release in: English , Urdu , Punjabi , Kannada