सांस्कृतिक मंत्रालय

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाच्या भागीदारीने आषाढ पौर्णिमा धम्म चक्र दिन 2021 निमित्त दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित केले


राष्ट्रपती, पंतप्रधानांनी बुद्धांच्या शिकवणीचे स्मरण केले

Posted On: 24 JUL 2021 9:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 जुलै 2021

राष्ट्रपती राम नाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय आणि जागतिक बौद्ध समुदायाला आषाढ पौर्णिमा आणि गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन  आपला बौद्ध वारसा साजरा केला.

आषाढ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी संघाची स्थापना झाली होती आजचा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिवस  म्हणूनही  ओळखला जातो आणि वेसाक बुद्ध पौर्णिमेनंतर बौद्ध धर्माच्या पालनाचा दुसरा सर्वात महत्वाचा दिवस आहे.

आषाढ पौर्णिमा आणि बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बोलताना राष्ट्रपती राम नाथ कोविंद म्हणाले बौद्धतत्वज्ञावर 550 दशलक्षाहून अधिक अनुयायांचा दृढ विश्वास आहे. इतर धर्माचे लोक आणि  नास्तिकही  बुद्धांच्या शिकवणुकीकडे आकर्षित होतात. जागतिक समस्यांवर बौद्ध मूल्ये आणि तत्त्वांचा अवलंब केल्यास समस्या दूर होतील आणि हे जग उत्तम स्थान बनविण्यात मदत होईल असेही त्यांनी पुढे सांगितले.

कोरोना महामारीच्या काळातही भगवान बुद्धांची शिकवण कालसुसंगत असल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पवित्र दिनानिमित्त केलेल्या भाषणात भर दिला. सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिवस आणि आषाढ पौर्णिमेच्या शुभेच्छा देताना  आज  गुरु पौर्णिमा असल्याची आठवणही त्यांनी करून दिली .  आजच्याच दिवशी भगवान बुद्धांनी बुद्धप्राप्ती नंतर आपले पहिले ज्ञान जगाला दिले होते.जिथे ज्ञान आहे तिथेच पूर्णत्व आहे,  आणि जेव्हा उपदेश देणारे स्वतः बुद्ध असतील तर हे ज्ञान संसाराच्या कल्याणाचा पर्याय ठरेल . गौतम बुद्ध जेव्हा बोलतात, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ते धम्मचक्र प्रवर्तन असते. यामुळेच, त्यावेळी त्यांनी केवळ पाच शिष्यांना उपदेश केला होता, मात्र आज संपूर्ण जग त्यांच्या शब्दांचे, ज्ञानाचे अनुयायी झाले आहेत.असे ते म्हणाले.

 'केअर विथ प्रेअर ' उपक्रमांतर्गत महत्वाची कोविड विरोधी मदत उपकरणे व साहित्य जमवण्याबद्दल आयबीसी आणि त्याचे जागतिक सदस्य व भागीदार यांचेही पंतप्रधानांनी कौतुक केले.

केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि ईशान्य प्रदेश विकास मंत्री  किशन रेड्डी यांनी आपल्या व्हिडिओ संदेशात अधोरेखित केले की भारत आपले स्वातंत्र्याचे  75 वे वर्ष आणि आझादी का अमृत महोत्सव साजरे  करणार असून  बुद्ध आणि बौद्ध वारशाचे योगदान या उत्सवांचा एक महत्त्वाचा भाग असेल.

हा कार्यक्रम  मुलागंधकुटी विहार मंदिर सारनाथ, महा बोधि मंदिर, बोधगया (भारत)  आणि  मायादेवी मंदिर, लुंबिनी, नेपाळ येथून थेट वेबकास्टच्या माध्यमातून रिले करण्यात आला. हनोईच्या क्वान सु पागोडा येथे व्हिएतनाम बौद्ध संघाने त्याचवेळी प्रार्थना कार्यक्रम आयोजित केला होता ज्याला व्हिएतनाममधील ज्येष्ठ भिक्षु उपस्थित होते.

बुद्ध जयंती पार्क, नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात 1965 मध्ये लावलेल्या बोधी वृक्षाखाली मंगलागाथाचा संघांकडून जयघोष करण्यात आला.

थायलंड, कंबोडिया, परमपूज्य दलाई लामा, व्हिएतनाम, श्रीलंका आणि इतर देशांमधील  बौद्ध संघाच्या सर्वोच्च प्रमुखांनी  व्हिडिओ संदेश पाठवले.

जगभरातील लाखो बौद्धांनी हे सर्व कार्यक्रम थेट पाहिले.

Jaydevi PS/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1738700) Visitor Counter : 237