राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपती येत्या 25 ते 28 जुलै दरम्यान जम्मू काश्मीर आणि लडाखला भेट देणार

Posted On: 24 JUL 2021 5:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 जुलै 2021

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे 25 जुलै ते 28 जुलै 2021 या कालावधीत जम्मू काश्मीर आणि लडाखला भेट देणार आहेत.

कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने, 26 जुलै 2021 रोजी राष्ट्रपती हे  1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धात भारतीय लष्कराने दाखवलेल्या अतुलनीय धैर्य आणि त्यागाला लडाखमधील द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकस्थळी जाऊन, आदरांजली वाहतील.

राष्ट्रपती 27 जुलै 2021 रोजी  श्रीनगरमधील काश्मीर विद्यापीठाच्या एकोणिसाव्या वार्षिक पदवीदान समारंभाला उपस्थित राहून उपस्थितांना संबोधित करतील.

 

 Jaydevi PS/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1738622) Visitor Counter : 160