आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड -19 विरोधी लढा देण्यासाठी राज्यांना केलेले सहकार्य

Posted On: 23 JUL 2021 11:10PM by PIB Mumbai

 

सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना कोविड-19 महामारी रोखण्यासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य दिले जात आहे. भारत कोविड-19 तत्काळ प्रतिसाद व आरोग्य प्रणाली तयारी पॅकेज" योजनेअंतर्गत दिनांक 22 एप्रिल 2020 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने15,000 कोटी रुपये मंजूर केले आहेत.

या पॅकेजअंतर्गत वित्तीय वर्ष 2020-21मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) या योजनेद्वारे राज्य / केंद्रशासित प्रदेशांना 8257.88 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे त्यापैकी 110 .60कोटी रुपये आरोग्य कर्मचार्‍यांच्या विम्याच्या देयकासाठी वितरीत केले आहेत. त्याचा राज्यनिहाय तपशील परिशिष्ट -१ मध्ये दिला आहे.

त्याशिवाय आर्थिक वर्ष 2020-21मध्ये कोविड -19 लसीकरण मोहिमेअंतर्गत राज्य / केंद्रशासित प्रदेशांतील आरोग्य सेवा कामगार आणि आघाडीच्या कामगारांच्या लसीकरणासाठी (HFW &FLW) कार्यान्वित केलेला खर्च त्यांना प्रदान करण्यात आला. त्याचा राज्य-निहाय तपशील परिशिष्ट II मध्ये देण्यात आला आहे.

कोविड 19 च्या दुसर्‍या लाटेच्या व्यवस्थापनासाठी विविध देशांनी केलेल्या मदत साहित्याचा डेटाबेस दाखविलेला आहे. त्या साधनांचा देशनिहाय तपशील :The item- and country-wise details can be accessed atMoHFW website (link: https://main.mohfw.gov.in/node

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

***

G.Chippalkatti/S.Patgoankar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1738397) Visitor Counter : 118


Read this release in: English , Urdu , Bengali , Punjabi