आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केंद्र सरकारच्या ई-संजीवनी उपक्रमाद्वारे 80 लाखांहून  अधिक रुग्णांना सेवा पुरवण्यात आली

Posted On: 23 JUL 2021 5:54PM by PIB Mumbai

 

भारत सरकारची  ई संजीवनी ही  राष्ट्रीय टेलिमेडिसिन  सेवा  लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे. 80 लाख दूरध्वनी-सल्ला मसलती  पूर्ण करून त्याने आणखी एक महत्वाचा टप्पा पार केला आहे. सध्या राष्ट्रीय टेलिमेडिसिन सेवा 35 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत आहे आणि दररोज देशभरातील 60 हजारांहून अधिक रूग्ण राज्य व केंद्रशासित प्रदेशांमधील शासकीय आरोग्य सेवा यंत्रणेकडून आरोग्य सेवा मिळवण्यासाठी याचा  वापर करत  आहेत.

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने स्थापन केलेली नॅशनल टेलीमेडिसिन सेवा दोन टेलिमेडिसिन प्लॅटफॉर्मद्वारे दोन प्रकारची टेलि-मेडिसिन सेवा प्रदान करत आहे. ई संजीवनी एबी-एचडब्ल्यूसी (डॉक्टर-डॉक्टर टेलिकन्सलटेशनसाठी) हब आणि स्पोक मॉडेलवर आधारित आहे आणि ईसंजीवनीओपीडी (रूग्ण - डॉक्टर टेलिकन्सलटेशन) नागरिकांना त्यांच्या घरांमध्ये  बाह्यरुग्ण सेवा प्रदान करते.

नोव्हेंबर 2019 मध्ये, केंद्र  सरकारच्या आयुष्मान भारत योजनेंतर्गत  ई संजीवनी एबी-एचडब्ल्यूसीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली.  डिसेंबर  2022 पर्यंत देशातील 1,55,000 आरोग्य व कल्याण केंद्रांवर ती कार्यरत होईल. त्याची अंमलबजावणी झाल्यापासून, ई-संजीवनीएबी-एचडब्ल्यूसी सुमारे 25000 आरोग्य व कल्याण केंद्रावर  कार्यरत आहे आणि  वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रे यासह सुमारे 2000 केंद्रांवर  ई संजीवनी एबी-एचडब्ल्यूसीने सुमारे 39 लाख कन्सलटेशन पूर्ण केल्या आहेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

***

M.Chopade/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1738281) Visitor Counter : 140


Read this release in: English , Hindi , Punjabi , Telugu