अन्न प्रक्रिया उदयोग मंत्रालय

अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने मेगा फूड पार्क योजनेचे नुकतेच केले थर्ड पार्टी मूल्यांकन

Posted On: 23 JUL 2021 1:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 जुलै 2021

अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय, (एमओएफपीआय) ने अलीकडेच मेगा फूड पार्क योजनेचे थर्ड पार्टी मूल्यांकन केले आहे. मान्यताप्राप्त मेगा फूड पार्क्सच्या कामकाजाचा अंतर्भाव या मूल्यमापनात करण्यात आला आहे.

मूल्यांकन अभ्यासानुसार मेगा फूड पार्क योजनेत अन्न प्रक्रिया घटकांची स्थापना करणे, मूल्यवर्धन आणि प्रक्रियेवर होणारा परिणाम, पीक काढणीनंतर होणारे नुकसान कमी करणे, शेतकर्‍यांना मिळणारे फायदे, रोजगारनिर्मिती इत्यादीसह अन्न प्रक्रिया उद्योगासाठी पायाभूत सुविधा तयार करण्याच्या बाबींचा समावेश होतो.

मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील आंतर-मंत्रालयीन मंजूरी समितीसह विविध स्तरावरील प्रकल्पांच्या प्रवर्तकांशी नियमितपणे आढावा बैठका घेऊन मेगा फूड पार्क प्रकल्पांच्या अंमलबजावणीच्या प्रगतीवर नियमितपणे देखरेख ठेवली जाते.

मंत्रालयाच्या अधिकार्‍यांकडून प्रकल्प ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी केली जाते. योजनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यक्रम व्यवस्थापन संस्था (पीएमए) देखरेख ठेवून प्रकल्पाच्या प्रगतीबाबत मंत्रालयाला अहवाल देते. पीएमए व्यतिरिक्त, पायाभूत स्तरावर प्रकल्प सुरळीतपणे राबविण्यासाठी, मंत्रालयाने नियुक्त केलेले कार्यक्रम व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांमार्फत काम करतात.

केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री प्रह्लादसिंह पटेल यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

 

G.Chippalkatti/V.Joshi/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1738090) Visitor Counter : 137


Read this release in: English , Urdu , Punjabi