कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

दिव्यांगांसाठी आरक्षण

Posted On: 22 JUL 2021 7:46PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 जुलै 2021

दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा 2016 हा इ दिव्यांग व्यक्तींना आरक्षणाचा हक्क देतो.

केडरच्या संख्येनुसार थेट नियुक्तीने भरल्या जाणाऱ्या एकूण पदांपैकी चार टक्के म्हणजे  प्रत्येक गटातील उदा. अ, ब आणि क श्रेणीतील  चार टक्के पदे अशा व्यक्तींसाठी पुढील प्रकारे राखून ठेवली जातात.

शारीरिक दुर्बलतेचा प्रकार

 

पदांची टक्केवारी

 

(a) अंधत्व किंवा कमी दिसणे

 

1%

(b) बहिरेपणा किंवा श्रवणदोष

 

1%

(c) हालचालींशी संबंधित दुर्बलता. सेरेब्रल पाल्सी, बरा झालेला कुष्ठरोग, खुजेपणा, ॲसिडहल्ल्याचे बळी आणि मस्क्युलर डिस्ट्रोफी

 

1%

 

(d) ऑटिझम, गतिमंदत्व , विशेष आकलन दुर्बलता आणि मानसिक आजार

 

(e) याशिवाय a ते d या कलमांखाली येणारे म्हणजेच बहिरेपणा आणि अंधत्व यांच्यासह इतर शारीरिक व्यंग असणारे.

 

1%

 

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे तसेच  भूशास्त्र मंत्रालयाचे  राज्यमंत्री, (स्वतंत्र कार्यभार),  पंतप्रधान कार्यालय, कार्मिक आणि सार्वजनिक तक्रार निवारण निवृत्तीवेतन अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1737877)
Read this release in: English , Urdu , Punjabi , Tamil