युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांनी ऑलिम्पिकसाठी 88 सदस्यांची तुकडी रवाना केली; 135 कोटी भारतीयांच्या शुभेच्छा त्यांच्यापाठीशी असल्याची दिली ग्वाही
प्रविष्टि तिथि:
17 JUL 2021 11:31PM by PIB Mumbai
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 54 खेळाडूंसह 88 सदस्यांचा समावेश असलेल्या भारतीय चमूला आज रात्री औपचारिक निरोप देण्यात आला. केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामणिक यांनी खेळाडूंशी संवाद साधला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
ACE0.jpg)
बॅडमिंटन, तिरंदाजी , हॉकी, ज्युडो, जलतरण, भारोत्तोलन , जिम्नॅस्टिक आणि टेबल टेनिस या आठ क्रीडाप्रकारांमधील खेळाडू व सहाय्यक कर्मचारी नवी दिल्लीहून टोक्योला रवाना झाले.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर ध्रुव बत्रा; भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस राजीव मेहता आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक संदीप प्रधान यावेळी उपस्थित होते. खेळाडूंची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी निगेटिव्ह कोविड चाचणी अहवाल असलेल्या मान्यवरांना आणि अधिकाऱ्यांना या कार्यक्रमासाठी प्रवेश देण्यात आला होता. 127 खेळाडू टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले असून आतापर्यंतचे हे सर्वात मोठे खेळाडूंचे पथक आहे.
X2KI.jpg)
केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले, “जेव्हा तुम्ही ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी जाता तेव्हा तो केवळ तुमच्यासाठीच नाही तर संपूर्ण देशासाठी एक महत्त्वाचा क्षण असतो. तुमची शिस्त , निर्धार आणि समर्पणामुळेच हे शक्य झाले आहे आणि म्हणूनच तुम्ही आज इथे टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करत आहात. मला खात्री आहे की जेव्हा तुम्ही मैदानावर उतराल तेव्हा तुमच्याकडे भरपूर ऊर्जा , निर्धार आणि प्रेरणा असेल. पंतप्रधान मोदींनी म्हटल्याप्रमाणे कृपया खुल्या मनाने जा. 135 कोटी भारतीय , त्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद तुमच्याबरोबर आहेत. ”
युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक म्हणाले की, “तुमचे आतापर्यंतचे प्रयत्न आणि तयारी याने तुम्हाला हा क्षण दाखवला आहे. टोक्यो ऑलिंपिकच्या जगातील सर्वात मोठ्या क्रीडा मंचावर तुम्ही स्पर्धा करायला उतराल , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि 135 कोटी भारतीय तुम्हाला प्रोत्साहन देत असतील आणि आणि तेथे खेळताना या सर्वांचे आशीर्वाद तुमच्याबरोबर असतील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो ."
भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर ध्रुव बत्रा आणि सरचिटणीस राजीव मेहता यांनीही यावेळी खेळाडूंना संबोधित केले.
***
Jaidevi PS/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1736487)
आगंतुक पटल : 365