संरक्षण मंत्रालय

चंदीनगर येथील हवाई दल केंद्रातील गरुड रेजिमेंटल प्रशिक्षण केंद्रात मरून बेरेट प्रशिक्षणार्थींचा  संचलन सोहळा

Posted On: 17 JUL 2021 6:10PM by PIB Mumbai

 

भारतीय हवाई दलाच्या 69 व्या हवाई दल विशेष दल संचालक (गरुड) तुकडीच्या प्रशिक्षणाच्या यशस्वी समाप्तीनिमित्त चंदीनगर येथील हवाई दल केंद्रातील गरुड रेजिमेंटल प्रशिक्षण केंद्रात 17 जुलै 2021 रोजी प्रभावशाली मरून बेरेट प्रशिक्षणार्थींचा  संचलन सोहळा (एमबीसीपी) संपन्न झाला. एअर कमोडोर के. खजुरिया व्हीएसएम, एअर कमोडोर ऑपरेशन्स (ऑफेन्सिव्ह) हे कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते त्यांनी दीक्षांत संचलनाची पाहणी केली. .

प्रमुख अतिथींनी गुणवंत प्रशिक्षणार्थींना प्रतिष्ठित चषक  प्रदान केले  आणि यशस्वी गरुड प्रशिक्षणार्थ्यांना मरून बेरेट, गरुड प्राविण्य  चिन्ह  आणि विशेष सैन्याचे नामचिन्ह प्रदान केले . सर्वोत्कृष्ट अष्टपैलू चषक  एल.ए.सी. अखोका मुइवा यांना प्रदान  करण्यात आला .तरुण गरुड कमांडोजला संबोधित करताना प्रमुख अतिथींनी, प्रशिक्षणार्थींनी व्यावसायिकतेचा  उच्च स्तर  टिकवून ठेवण्याच्या गरजेवर जोर दिला.तसेच प्रशिक्षण कर्मचार्‍यांनी घेतलेल्या  कठोर परिश्रमांबद्दल  त्यांचे अभिनंदन केले.आणि उंच भरारी घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले.

संचालनादरम्यान, गरूड्स प्रशिक्षणार्थींने लढाईतील गोळीबाराचे कौशल्य म्हणजेच कॉम्बॅट फायरिंग स्किल , ओलीस ठेवलेल्यांच्या बचावासाठी होस्टज रेस्क्यू फायरिंग ड्रिल, प्राणघातक स्फोटकांची हाताळणी , ऑब्स्टॅकल  क्रॉसिंग ड्रिल, वॉल क्लाइंबिंग / स्लॉइनिंग / रॅपलिंग कौशल्य  आणि मिलिटरी मार्शल आर्ट अशा विविध कौशल्यांचे प्रदर्शन केले.

मरून बेरेट संचलन सोहळा हा  गरुड्स प्रशिक्षणार्थींसाठी अभिमान आणि कर्तृत्वाचा क्षण आहे आणि हा क्षण  त्यांच्यात युवा विशेष दल संचालक म्हणून परिवर्तन घडवून आणण्याच्या प्रशिक्षणाचा समाप्तीला चिन्हांकित करणारा  आहे.

***

Jaydevi PS/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1736445) Visitor Counter : 230