ऊर्जा मंत्रालय

केंद्रीय ऊर्जा आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंह यांनी “शाश्वत वस्तीचे उद्दिष्ट : बांधकाम क्षेत्रातील उर्जा कार्यक्षमता 2021 मधील नवीन उपक्रम” चे उद्‌घाटन केले


बीईई 15,000 हून अधिक वास्तुविशारद, अभियंते आणि सरकारी अधिकाऱ्यांना बांधकाम क्षेत्रातील कार्यक्षमतेबद्दल प्रशिक्षण देणार

Posted On: 16 JUL 2021 8:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 जुलै 2021

केंद्रीय ऊर्जा आणि नवीन व नवीकरणीय  ऊर्जा मंत्री आर.के. सिंह यांनी आज 'आझादी का अमृत महोत्सव' चा भाग म्हणून  बांधकाम  क्षेत्रातील ऊर्जा कार्यक्षमतेसाठी केंद्र सरकारने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची घोषणा केली.

उपस्थितांना संबोधित  करताना आर.के. सिंह म्हणाले की, बांधकाम  क्षेत्र हा उद्योगानंतर विजेचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक आहे परंतु 2030 पर्यंत ते सर्वात मोठे ऊर्जा वापर करणारे क्षेत्र बनण्याची शक्यता आहे. त्याचे महत्त्व लक्षात घेऊन केंद्र सरकार निवासी तसेच व्यावसायिक इमारतींमध्ये उर्जा कार्यक्षमता सुधारण्यावर भर देत आहे.

आज सुरू केलेले उपक्रम पुढीलप्रमाणे –

  • बांधकाम सेवांसाठी संहिता अनुपालन पध्दती आणि किमान  उर्जा कामगिरीची आवश्यकता  आणि इको निवास संहिता 2021 सह पडताळणी व्यवस्था नमूद  करणे.
  • वेब-आधारित प्लॅटफॉर्म 'ऊर्जा कार्यक्षम निवासी इमारतींसाठी प्रतिकृतीयोग्य डिझाइन पुस्तिकेचा' एक शैक्षणिक साधन म्हणून  भारतात ऊर्जा-कार्यक्षम घरे बांधण्यासाठी प्रतिकृतीयोग्य डिझाईनचा वापरण्यास तयार संसाधनांचा  साठा तयार करण्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो.
  • बांधकाम  साहित्याची ऑनलाईन डिरेक्टरी तयार करणे जी ऊर्जा कार्यक्षम इमारतींच्या साहित्यांसाठी मानक स्थापित करण्याची प्रक्रिया मांडेल.
  • बीईईच्या ऊर्जा संवर्धन बांधकाम  संहितेचे  पालन करणार्‍या अपवादात्मक कार्यक्षम इमारतींच्या डिझाइनला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने निर्माण  (परवडणारी आणि नैसर्गिक निवासस्थानासाठी राष्ट्रीय उर्जा कार्यक्षमता आराखडा)पुरस्कारांची घोषणा
  • उर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि वैयक्तिक घरांमधील उर्जा वापर कमी करण्यासाठी तयार केलेल्या ऊर्जा  कार्यक्षम घरांसाठी ऑनलाइन स्टार रेटिंग टूल. हे व्यावसायिकांना त्यांच्या घरातील ऊर्जा-कार्यक्षमतेसाठी सर्वोत्तम पर्याय निवडण्यात मदत करण्यासाठी कामगिरीचे  विश्लेषण प्रदान करते.
  • ऊर्जा संवर्धन बांधकाम  संहिता (ईसीबीसी) 2017 आणि इको निवास संहिता (ईएनएस) 2021) बाबत  15,000 पेक्षा जास्त वास्तुतज्ञ, अभियंते आणि सरकारी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण.

 

 

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1736281) Visitor Counter : 295