भारतीय स्पर्धा आयोग

भारतीय स्पर्धा आयोग (सीसीआय) ला सिनर्जी मेटल्स इन्व्हेस्टमेंट होल्डिंग लिमिटेडकडून जेएसडब्ल्यू सिमेंटमधील भांडवली हिस्सा अधिग्रहण प्रकरणी ग्रीन चॅनेल अंतर्गत नोटिस मिळाली असून ती ग्राह्य मानली गेली आहे

Posted On: 15 JUL 2021 5:29PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जुलै 2021

भारतीय स्पर्धा आयोग (सीसीआय) ला सिनर्जी मेटल्स इन्व्हेस्टमेंट होल्डिंग लिमिटेडकडून जेएसडब्ल्यू सिमेंटमधील भांडवली हिस्सा खरेदी प्रकरणी ग्रीन चॅनेल अंतर्गत नोटिस मिळाली असून ती ग्राह्य मानली गेली आहे

सिनर्जी मेटल्स आणि मायनिंग फंड आयएलपी (सिनर्जी फंड) अर्थात अधिग्रहणकर्ता कंपनी ही गुंतवणूक निधी आहे . सिनर्जी मेटल्स इन्व्हेस्टमेंट होल्डिंग लिमिटेड  ही अधिग्रहणकर्ता कंपनीची अंतिम नियंत्रक ही आहे. सिनर्जी फंड, जगभरातील उद्योग, धातू, आणि ऊर्जा क्षेत्रामध्ये या क्षेत्रात  गुंतवणूक करतो.

जेएसडब्ल्यू सिमेंट ही लक्ष्यीत कंपनी ही भारतातील एक सूचीबद्ध नसलेली  सार्वजनिक कंपनी ऑन ती जेएसडब्ल्यू समूहाची कंपनी आहे. त्यांच्याअंर्तभूत  व्यवसाय उद्योगांमध्ये (a) सिमेंट, क्लिंकर, ग्राउंड ग्रेन्युलेटेड ब्लास्ट- फर्नेस स्लॅग, स्लॅग सँडेड आणि संबंधित उत्पादनांचे उत्पादन आणि व्यापार, (b) सिमेंट उत्पादनासाठी कच्च्या मालाचे उत्खनन करणे, गाळणे, कोरडे करणे, अन्य आवश्यक सर्व प्रक्रिया, (c) रस्ते वाहतूक सेवा, (d) घरे, इमारतींच्या बांधकामासाठी जमीन आणि बांधकाम क्षेत्रातील खरेदी यासारखे व्यवसाय यांचा समावेश आहे.

Jaydevi PS/S.Shaikh/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1735895) Visitor Counter : 187


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu