युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते टोक्यो ऑलिंपिकसाठीच्या भारतीय चमूसाठीच्या स्फूर्तीगीताचे  आभासी उद्घाटन

Posted On: 14 JUL 2021 7:29PM by PIB Mumbai

 

केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते, आज टोक्यो येथे जाणाऱ्या भारतीय ऑलिंपिक चमूसाठीचे उत्साहवर्धक स्फूर्तीगीत म्हणजेच चीअर सॉंगचे आभासी उद्घाटन झाले. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री निशीथ प्रामाणिक, भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंदर बात्रा, भारतीय ऑलिम्पिक संघाचे सरचिटणीस राजीव मेहता, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक संदीप प्रधान, टारगेट ऑलिम्पिक पोडीयम स्कीम चे सीईओ, कमांडर राजगोपालन यावेळी उपस्थित होते. हिंदूस्थानी वेहे गीत पॉप सिंगर अनन्या बिर्ला यांनी गायले असून, सुप्रसिध्द संगीतकार ए आर रेहमान यांनी गीताला संगीतबद्ध केले आहे.

या कठीण काळात सर्व कलाकारांनी एकत्र येऊन हे अप्रतिम गीत सादर केल्याबद्दल अनुराग ठाकूर यांनी यावेळी सर्व कलाकारांचे अभिनंदन केले. या उपक्रमासाठी पुढाकार घेतल्याबद्दल, ए आर रेहमान आणि अनन्या बिर्ला यांचे मी अभिनंदन करतो. त्यांनी संपूर्ण उत्साह आणि समर्पणाने हे गीत तयार केले आहे, कोविड-19 च्या संकटकाळातही हे गीत तयार करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. आपण या गीतात मनापासून रस घेत, टीम इंडियाचा उत्साह वाढवण्यासाठी हे गीत तयार केले आहे. मी या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो. असे ठाकूर यावेळी म्हणाले.

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व ऑलिम्पिक खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी, केलेल्या शुभारंभालाच पुढे नेणारा  हा एक आणखी प्रोत्साहनपर प्रयत्न आहे, अशा शब्दांत निशीथ प्रामाणिक यांनी या गीताचे कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोक्योला जाणाऱ्या सर्व खेळाडूंचे मनोबल आणि उत्साह वाढवण्यासाठी, चीअरफॉरइंडिया-  #Cheer4India उपक्रम सुरु केला आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत, संपूर्ण देश आपल्या खेळाडूंना पाठींबा देण्यासाठी आणि त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी पुढे आला आहे. हे गीतही त्यांना स्फूर्ती देणारे आहे. या गीताच्या रचनेबद्दल मी ज्येष्ठ संगीतकार ए आर रेहमान आणि युवा गायिका अनन्या बिर्ला यांचे मी आभार मानतो. असे प्रामाणिक यावेळी म्हणाले.

***

M.Chopade/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1735626) Visitor Counter : 218