विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून डॉ जितेंद्र सिंह यांनी स्वीकारला कार्यभार

Posted On: 08 JUL 2021 6:55PM by PIB Mumbai

 

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून डॉ जितेंद्र सिंह यांनी आज कार्यभार स्वीकारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, केंद्र सरकारने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक लक्षणीय उपक्रम सुरु केले आहेत, असे त्यांनी सांगितले.

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राचे लाभ सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत पोचवण्यासाठी तसेच त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी परिश्रम करु असा मनोदय जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला.

कार्यभार स्वीकारल्यानंतर, त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या अखत्यारीतील विविध विभागांच्या प्रमुखांची बैठक घेऊन विभागातील कामांची माहिती घेतली.

यावेळी मंत्र्यासमोर, CSIR कडून कोविड-19 शी संबंधित विषयांवर सादरीकरण करण्यात आले.

***

M.Chopade/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1733812) अभ्यागत कक्ष : 161