संरक्षण मंत्रालय
अजय भट्ट यांनी संरक्षण राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला
Posted On:
08 JUL 2021 5:06PM by PIB Mumbai
अजय भट्ट यांनी 08 जुलै 2021 रोजी संरक्षण राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची साऊथ ब्लॉकमधील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार आणि संरक्षण मंत्रालयाच्या अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अजय भट्ट यांचे कार्यालयात स्वागत केले. एका ट्विटमध्ये अजय भट्ट यांनी ही जबाबदारी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आणि एकविसाव्या शतकातील ‘आत्मनिर्भर भारत’ निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करू असे म्हटले आहे.
अजय भट्ट उत्तराखंडमधील नैनीताल-उधमसिंह नगर मतदार संघातले खासदार आहेत. ते संरक्षणविषयक स्थायी समिती, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची सल्लागार समिती, गौण कायदे समिती; वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक 2019 संबंधी संयुक्त समिती आणि अनुमान समितीचे सदस्य आहेत; यापूर्वी त्यांनी उत्तराखंड सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून काम करताना संसदीय कामकाज, आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन खात्याचा कारभार पाहिला होता. ते उत्तराखंड विधानसभेत विरोधी पक्षनेते देखील होते.
***
S.Tupe/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1733747)
Visitor Counter : 184