नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
राज कुमार सिंह यांनी केंद्रीय ऊर्जा व नवीन व नवीकरणीय उर्जा मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला
Posted On:
08 JUL 2021 3:12PM by PIB Mumbai
राज कुमार सिंह यांनी ऊर्जा मंत्रालय आणि नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयात कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला.
पंतप्रधानांनी जबाबदारी दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करताना आर.के. सिंह म्हणाले की पंतप्रधानांनी मोठा विश्वास दाखवला आहे आणि आम्ही त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू.
कार्यभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी साधलेल्या संवादात सिंह पुढे म्हणाले की पंतप्रधानांनी ठरवून दिलेले विद्युतीकरणाचे उद्दिष्ट आपण निर्धारित वेळेपूर्वीच पूर्ण केले आहे आणि वीज व ऊर्जा क्षेत्राचे फायदे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतील यासाठी आपण प्रयत्नशील राहू.
यावेळी वरिष्ठ अधिकार्यांनी कार्यालयात त्यांचे स्वागत केले.
***
Jaydevi PS/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1733668)
Visitor Counter : 200