आयुष मंत्रालय

सीटीआरआय पोर्टलवरील आयुर्वेदिक डेटासेटचे उद्या प्रकाशन होणार


आयुष मंत्र्यांच्या हस्ते होणारे हे प्रकाशन आयुर्वेद आधारित वैद्यकीय चाचण्यांचे निष्कर्ष जागतिक पातळीवर उपलब्ध होण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल

सीसीआरएएस ने विकसित केलेल्या चार पोर्टल्सचेही होणार उद्घाटन

Posted On: 04 JUL 2021 9:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 जुलै 2021

 

आयुर्वेद-आधारित वैद्यकीय चाचण्या जागतिक स्तरावर उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टीने एक महत्वाचे पाऊल टाकत, सीटीआरआय पोर्टलवरच्या आयुर्वेदिक डाटा सेटचे उद्या आयुष मंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते, ऑनलाईन उद्घाटन होणार आहे. आयसीएमआर आणि आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीतील, सीसीआरएएसने हा डाटासेट तयार केला आहे. त्याशिवाय, रिजीजू यांच्या हस्ते आणखी चार पोर्टल्सचे उद्घाटन होणार आहे. ही सर्व पोर्टल्स देखील केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद-सीसीआरएएस ने विकसित केली आहेत.

सीटीआरआय ही जागतिक आरोग्य संघटनेच्या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय चाचण्या नोंदणी प्लॅटफॉर्मच्या अंतर्गत वैद्यकीय चाचण्यांची प्राथमिक नोंदणी व्यवस्था आहे. आयुर्वेदिक उपचारांमध्ये देनाय्त आलेली औषधे आणि त्यांचा वैद्यकीय उपयोग, त्यांच्याच आयुर्वेदिक परिभाषेत समजून घेत त्या उपयोगात आणण्यासाठी सीटीआरआय ने तयार केलेल्या या डाटासेट चा उपयोग होऊ शकेल. आतापर्यंत, आयुर्वेदिक वैद्यकीय चाचण्या आधुनिक वैद्यकशास्त्रांतील परिभाषांवरच अवलंबून असायच्या.

मात्र आता, आयसीएमआर-वैद्यकीय सांख्यिकीविषयक राष्ट्रीय संस्था आणि सीसीआरएएसच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आयुर्वेदिक परिभाषा देखील सिटीआरआयचा भाग बनल्या आहेत. य डिजिटल प्लॅटफॉर्मचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, नमस्ते (NAMASTE) पोर्टल वर असलेल्या आयुर्वेदिक परिभाषेनुसार आजारविषयक 3866 सांकेतिक क्रमांकांची इथेही निवड करण्याची सुविधा देण्यात आली आहे. आयुष मंत्रालयाने विकसित केलेल्या या पोर्टलवर आयुर्वेदानुसार, व्याधींची गटवारी आंतरराष्ट्रीय आजार प्रमाणन वर्गवारीनुसार करण्यात आली आहे. याचाच अर्थ, आता आयुर्वेदिक वैद्यकीय चाचण्या आणि निष्कर्षांची माहिती, आयुर्वेदिक शब्दावली आणि परिभाषेनुसार, भारतातील नोंदणीपटावर उपलब्ध असेल.

आणखी चार पोर्टल्स- अमर (AMAR), साही (SAHI), ई-मेधा (e-MEDHA) आणि आरएमआयएस (RMIS) चे देखील यावेळी उद्घाटन होणार आहे. हे सर्व पोर्टल CCRAS ने प्राथमिक पातळीवर विकसित केले असून RMIS पोर्टल आयसीएमआर आणि सीसीआरएएसने संयुक्तपणे विकसित केले आहे.


* * *

S.Thakur/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1732705) Visitor Counter : 381


Read this release in: English , Urdu , Punjabi , Tamil