विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

अग्रगण्य वैज्ञानिक संशोधनात महिलांच्या भूमिकेत वाढ

Posted On: 02 JUL 2021 6:23PM by PIB Mumbai

 

विज्ञान आणि संशोधनातील अग्रणी म्हणून महिलांचा सहभाग वाढत असल्याचे दिसत आहे.दोन वर्षांत संशोधन प्रकल्पांचे नेतृत्व करणार्‍या महिलांच्या टक्केवारीत चार टक्क्यांनी वाढ झाल्याचे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सरकारी अहवालात म्हटले आहे.

सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अवांतर संशोधन आणि विकास (आर अँड डी) प्रकल्प 2018-19 च्या मार्गदर्शिकेनुसार, वर्ष 2018-19 मध्ये अवांतर संशोधन (ईएमआर) साहाय्य (समान -पुनरावलोकन स्पर्धात्मक अनुदान यंत्रणेच्या माध्यमातून) प्राप्त झालेल्या संशोधनात महिला प्रधान संशोधक  (पीआय) यांचा  सहभाग 2016-17 च्या 24% च्या तुलनेत 28% होता.

अहवालात असेही  ते दिसून आले की, केंद्र सरकारकडून अवांतर संशोधन आणि विकास साहाय्य किंवा संशोधन आणि विकास साहाय्य समान -पुनरावलोकन स्पर्धात्मक अनुदान यंत्रणेच्या माध्यमातून, 2017 च्या 2036.32 कोटी रुपयांच्या तुलनेत 2018-19 मध्ये 2091.04 कोटी रुपये इतका निधी  वाढविण्यात आला आहे. महिला प्रधान संशोधकांच्या संख्येप्रमाणे सहाय्यक प्रकल्पांची संख्या वाढली आहे. एकूण महिला प्रधान संशोधकांनी  4616 प्रकल्प हाती घेतले आहेत.

या साहाय्यंपैकी निधीच्या  71% वाटा असलेले 64% प्रकल्प तमिळनाडू, दिल्ली, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या 8  राज्यांनी प्राप्त केले आहेत.

22 भारतीय तंत्रज्ञान संस्थांनी  (आयआयटी) एकत्रित 822  प्रकल्प सर्वाधिक 449.25 कोटी रुपयांच्या निधी असलेले प्राप्त केले आहेत .त्यानंतर 26 राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था (एनआयटी)यांना  एकत्रितपणे ,55.83 कोटी रुपयांचे आर्थिक पाठबळ असलेले 191 प्रकल्प प्राप्त झाले आहेत. जास्तीत जास्त आर्थिक सहाय्य अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाला प्राप्त  झाले आहेत तर  जास्तीत जास्त प्रकल्प जीवशास्त्रीय विज्ञानाला मिळाले आहेत.

अवांतर संशोधन आणि विकास (आर अँड डी) प्रकल्प साहाय्य  ही केंद्र सरकारची समान -पुनरावलोकन स्पर्धात्मक अनुदान यंत्रणा आहे, जी देशातील उत्प्रेरक आणि अत्याधुनिक संशोधनाला आणि विकासाला तसेच नवोन्मेषला चालना देण्याच्या दृष्टीने संशोधन कारकिर्दीसाठी  वैज्ञानिकांना विशेष प्रोत्साहन प्रदान करते.. मानव आणि संघटनात्मक संसाधन विकास केंद्र (सीएचआरडी) विभाग, विविध वैज्ञानिक संस्थांद्वारे वित्तपुरवठा केलेल्या अवांतर संशोधन आणि विकास प्रकल्पांची माहिती एकत्रित, विश्लेषण आणि प्रसारित करत  आहे.

केंद्र सरकारच्या विभाग / संस्थांच्या माध्यमातून  अनुदान मंजुरीसाठी अवांतर संशोधनआणि विकास प्रकल्पांची मार्गदर्शिका ,1990-91 पासून विज्ञान तंत्रज्ञान विभागाद्वारे प्रकाशित केली जात आहे. सरकारच्या विविध वैज्ञानिकसंस्थांनी सन 2018-19  या वर्षात अर्थसहाय्यित प्रकल्पांसाठी केलेल्या प्रयत्नांचा परिणाम म्हणजे मालिकेतील एकोणवीसावी सध्याची मार्गदर्शिका  आहे. या मार्गदर्शिकेत 2018-19 दरम्यान 16 वैज्ञानिक संस्था  / विभागांनी मंजूर केलेल्या 4616 संशोधन आणि विकास  प्रकल्पांची माहिती आहे.

सविस्तर अहवाल: https://dst.gov.in/sites/default/files/EM_Directory_2018_19_0.pdf

                           https://dst.gov.in/sites/default/files/EM_Directory_2017-18_0.pdf

***

Jaydevi PS/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1732320) Visitor Counter : 202


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi