वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
प्रकल्प देखरेख गटातल्या महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांचा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी घेतला आढावा
Posted On:
02 JUL 2021 2:47PM by PIB Mumbai
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी, पायाभूत क्षेत्रातल्या 20 मोठ्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी एक बैठक घेतली. पियुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली 29 जूनला झालेल्या या बैठकीत, या प्रकल्पाशी निगडीत मुद्यांच्या निराकरणासाठी, प्रकल्प देखरेख गटाशी त्यांनी चर्चा केली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्य मंत्री सोम प्रकाश, उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन सचिव, बिहार, हरियाणा आणि तामिळनाडूचे मुख्य सचिव आणि महाराष्ट्राचे अतिरिक्त मुख्य सचिव(उद्योग ) या बैठकीत दूरदृश्य प्रणाली द्वारे सहभागी झाले. रेल्वे, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, रस्ते वाहतूक आणि महामार्ग, पर्यावरण, वन आणि हवामान बदल अशा महत्वाच्या मंत्रालयाचे अधिकारीही बैठकीत सहभागी झाले. या प्रकल्पांच्या कामाच्या प्रगतीसाठी आणि हे महत्वाचे प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यामध्ये येणाऱ्या अडथळ्याबाबत यावेळी चर्चा झाली.
सुमारे 2.7 लाख कोटी रुपयांच्या अपेक्षित गुंतवणुकीच्या या 20 प्रकल्पातल्या 59 मुद्यांचा मंत्र्यांनी आढावा घेतला. पंतप्रधानांनी ‘प्रगती’ अंतर्गत आढावा घेतलेल्या 11 प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे.
आढावा घेण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये समावेश असलेल्या, पूर्व आणि पश्चिम मार्गावरच्या समर्पित मालवाहतूक कॉरीडॉरमुळे रेल्वे मालवाहतुकीची क्षमता वाढणार असून जंक्शनवर औद्योगिक विभाग स्थापन होणार आहेत. अमृतसर कोलकाता औद्योगिक कॉरीडॉर 7 राज्यातून जाणार असून पूर्व समर्पित मालवाहतूक कॉरीडॉर क्षेत्रात औद्योगिक उत्पादनाच्या विकासाला चालना देणार आहे.
हे प्रकल्प ठरलेल्या वेळेत व्हावेत या दृष्टीने प्रलंबित मुद्यांच्या निराकरणासाठी कालावधी निश्चित करत त्यांनी निर्देश दिले. देशाचा आर्थिक विकास आणि रोजगार निर्मितीसाठी महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांच्या बहुस्तरीय नियमित देखरेखीच्या महत्वावर गोयल यांनी भर दिला.
***
U.Ujgare/N.Chitale/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1732238)
Visitor Counter : 197