अर्थ मंत्रालय
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारण्यासाठी अरुण जेटली राष्ट्रीय वित्तीय व्यवस्थापन संस्थेची (एजेएनआयएफएम) मायक्रोसॉफ्टबरोबर भागीदारी
फिनटेकमध्ये क्लाउड आणि कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणित नवसंशोधनासाठी उत्कृष्टता केंद्राचा संयुक्त विकास
Posted On:
01 JUL 2021 7:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जुलै 2021
अरुण जेटली राष्ट्रीय वित्तीय व्यवस्थापन संस्था (एजेएनआयएफएम) आणि मायक्रोसॉफ्ट यांनी एजेएनआयएफएम येथे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारण्यासाठी धोरणात्मक भागीदारीसाठी सामंजस्य करारावर (एमओयू) स्वाक्षरी केली. या सहकार्याद्वारे भारतात सार्वजनिक वित्त व्यवस्थापनाचे भविष्य बदलण्यासाठी आणि त्याला आकार देण्यासाठी क्लाउड, एआय आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या भूमिकेची चाचपणी करण्याचा प्रयत्न आहे.
हे उत्कृष्टता केंद्र केंद्रीय संशोधन संस्था म्हणून काम करेल,. एजेएनआयएफएम आणि मायक्रोसॉफ्ट केंद्रीय आणि राज्य मंत्रालये आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये वित्त आणि संबंधित क्षेत्रांमधील उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या वापराचा संयुक्तपणे शोध घेतील. मायक्रोसॉफ्ट भारतात सार्वजनिक वित्त व्यवस्थापनाचे भविष्य परिभाषित करण्यासाठी भागीदार, कुशल सरकारी अधिकारी आणि विचारशील नेतृत्व तयार करण्यासाठी तंत्रज्ञान, साधने आणि संसाधने प्रदान करण्यासाठी एजेएनआयएफएमबरोबर भागीदारी करेल.
दोन्ही संघटना संबंधित मंत्रालये, विभाग आणि वित्तीय संस्थांमधील वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांसाठी क्षमता वाढवण्याच्या कार्यक्रमावरही एकत्रित काम करतील. या कौशल्य प्रयत्नांचा एक भाग म्हणून, सार्वजनिक क्षेत्रातील अधिका-यांना काळ्या पैशाचा धोका , निर्णय घेण्यासाठी मशीन लर्निंग मॉडेल्सचा वापर, वित्त क्षेत्रातील जबाबदार तंत्रज्ञानाची भूमिका इत्यादी संभाव्य जोखीम दूर करण्यासाठी वित्त व्यवस्थापनात उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या वापराबाबत प्रशिक्षण दिले जाईल. क्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाणारे सानुकूलित उपाय तयार करण्यासाठी, त्याचे भागीदार, एमएसएमई आणि आयएसव्ही बरोबर काम करेल.
एजेएनआयएफएम बद्दल
अरुण जेटली राष्ट्रीय वित्तीय व्यवस्थापन संस्था (एजेएनआयएफएम) हे सार्वजनिक धोरण, वित्तीय व्यवस्थापन आणि व्यावसायिक क्षमता आणि पद्धतीच्या सर्वोच्च मापदंडांना प्रोत्साहन देण्यासाठी व्यावसायिकांची क्षमता वाढवण्यात मदत करणारे एक उत्कृष्टता केंद्र आहे. 1993 मध्ये भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाअंतर्गत नोंदणीकृत संस्था म्हणून एजेएनआयएफएमची स्थापना झाली. एजेएनआयएफएम वेगवेगळ्या संघटित सेवेतील अधिकारी, विविध राज्य सरकारे आणि नागरी व संरक्षण आस्थापनांमधील कर्मचार्यांमध्ये संवाद आणि कल्पनांचे आदानप्रदान करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून प्रशासन आणि प्रशासकीय सुधारणांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. वरिष्ठ आणि मध्यम स्तरावरील व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारच्या प्रशिक्षण गरजा पूर्ण करण्यासाठी एजेएनआयएफएम एक प्रमुख संसाधन केंद्र बनले आहे.
* * *
M.Chopade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1732016)
Visitor Counter : 361