शिक्षण मंत्रालय

संजय धोत्रे यांनी भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (आयआयआयटी) श्री सिटी चित्तूर यांच्या दीक्षांत समारंभाला संबोधित केले

Posted On: 30 JUN 2021 7:28PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 जून 2021


शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी आज भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (आयआयआयटी) श्री सिटी चित्तूरच्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना व्हर्चुअली  संबोधित केले. आयआयआयटी श्री सिटीचे प्रशासकीय मंडळाचे  अध्यक्ष बालसुब्रमण्यम यावेळी उपस्थित होते. दीक्षांत समारंभादरम्यान संगणक विज्ञान व अभियांत्रिकीचे 164 विद्यार्थी आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकीच्या 97 विद्यार्थ्यांसह एकूण 261 विद्यार्थ्यांना पदव्या देण्यात आल्या. यामध्ये दोन्ही शाखांमधील 28 ऑनर्स विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

 

धोत्रे म्हणाले की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे उद्दीष्ट भारताला जागतिक ज्ञान महासत्ता बनवणे हे आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक रुची, तर्कशुद्ध आणि विश्लेषणात्मक विचार विकसित करण्याचा प्रयत्न करणे, 21 व्या शतकातील ज्ञान आणि कौशल्यानी विद्यार्थ्यांना समृद्ध करण्याबरोबरच मानवतेची मूल्ये जोपासलेले व्यक्तिमत्व विकसित करणे हे आहे.  ते पुढे म्हणाले की, आपले विद्यार्थी केवळ अव्वल दर्जाचे विद्यार्थी  होणार नाहीत, तर ते हा  देश आणि जगाचे उच्च-दर्जाचे नागरिकही बनतील.

तंत्रज्ञानाचे महत्त्व सांगताना धोत्रे यांनी विद्यार्थ्यांना सामान्य माणसाच्या समस्या सोडवण्यासाठी, शेतीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि त्यांचे उत्पन्न सुधारण्यासाठी तसेच ऊर्जा सुरक्षेची हमी, कार्यक्षम मार्गाने प्रत्येक घरात पाईपद्वारे पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी  या तंत्रज्ञानाचा कसा उपयोग करता येईल याचा शोध घेण्याचे आवाहन केले;

ते  म्हणाले की संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेचा  कायापालट करण्यात तंत्रज्ञान मोठी  भूमिका बजावत आहे. पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी काम करत असताना, भारत डिजिटल अर्थव्यवस्थेच्या सामर्थ्यावर सक्रियपणे लक्ष केंद्रित करत आहे. ते पुढे म्हणाले की, या नवीन भारताला समस्यांवर स्मार्ट उपाय शोधणाऱ्या तरूण तंत्रज्ञाची आवश्यकता आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना आपली भूमिका बजावण्याचे आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रात आपल्या देशाला जागतिक नेतृत्व बनवण्यात हातभार लावण्याचे  आवाहन  केले

 

* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1731653) Visitor Counter : 35