ग्रामीण विकास मंत्रालय
दीनदयाल अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानामधील लिंगभेद दूर करण्यासाठी करत असलेल्या सर्वोत्तम पद्धतींबद्दल नरेंद्र सिंह तोमर यांनी एक संक्षिप्त माहिती पुस्तिका प्रकाशित केली
Posted On:
29 JUN 2021 7:35PM by PIB Mumbai
केंद्रीय ग्रामविकास, कृषी व शेतकरी कल्याण, पंचायती राज आणि अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी आज दीनदयाल अंत्योदय योजना - राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (डीएवाय -एनआरएलएम ) स्वयं सहायता गट महासंघाच्या सामाजिक कृती समित्यांद्वारे लिंगभेदाच्या समस्या कशाप्रकारे सोडवत आहेत यावर देशभरातून संकलित केलेल्या सर्वोत्तम पद्धतींवर एक संक्षिप्त माहिती पुस्तिका प्रकाशित केली. महिला व मुलींना आधार प्रदान करण्यात आघाडीवर असलेल्या ग्राम संघटना सामाजिक कृती समित्यांची कल्पना आणि गाथा सांगण्यासाठी आयोजित केलेल्या व्हर्च्युअल कार्यक्रमात ही पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. यावेळी राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती आणि ग्रामीण विकास मंत्रालय, राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि ग्रामीण भागातील संघटना आणि सर्व राज्यातील क्लस्टर लेव्हल फेडरेशनचे सदस्य ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे उपस्थित होते.
उपेक्षित आणि असुरक्षित महिला आणि मुलींना आधार देण्यासाठी स्थानिक प्रशासन यंत्रणा तयार करून, भारताला अधिक मजबूत व स्वावलंबी बनवण्याच्या दिशेने हे प्रयत्न महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. विविध क्षेत्रातल्या वैभवशाली परंपरा आणि प्रगती सामायिक करण्यासाठी भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनिमित्त पंतप्रधानांनी सुरू केलेल्या आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून भारतातील बचत-गट चळवळ भारतीय महिलांची लवचिकता आणि धैर्य याचे दर्शन घडवते.
कोविड -19 चा प्रसार रोखण्यासाठी तसेच लोकांना लस घेण्यास प्रोत्साहित करण्याबाबत जनजागृती करण्यात बचत गट सदस्य आणि सामाजिक कृती समित्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात असे त्यांनी अधोरेखित केले.
***
M.Chopade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1731222)
Visitor Counter : 329