सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
29 जून 2021 या दिवशी सांख्यिकी दिन होणार साजरा
संकल्पना : शाश्वत विकास उद्दिष्टे (एसडीजी) – 2 : उपासमारीचा अंत , अन्न सुरक्षा साध्य करणे, पोषण सुधारणे आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे
Posted On:
28 JUN 2021 11:47AM by PIB Mumbai
दैनंदिन जीवनात सांख्यिकीचा उपयोग लोकप्रिय करण्यासाठी आणि धोरणे आखण्यासाठी आणि त्यांना आकार देण्यासाठी सांख्यिकीचे सहाय्य कसे होते याबाबत जनतेला माहिती मिळावी या उद्देशाने केंद्र सरकार सांख्यिकी दिन साजरा करते. राष्ट्रीय स्तरावर विशेष दिन म्हणून हा दिवस साजरा करण्यात येत असून राष्ट्रीय सांख्यिकी प्रणाली उभारण्यामधल्या अमुल्य योगदानासाठी दिवंगत प्राध्यापक पी सी महालनोबीस यांच्या 29 जून या जन्मदिनी, हा दिवस साजरा केला जातो.
कोरोना-19 महामारीमुळे या वर्षी सांख्यिकी दिन 2021 चा मुख्य कार्यक्रम नीती आयोग नवी दिल्ली इथे दूर दृश्य प्रणाली/ वेबकास्टिंग द्वारे आयोजित केला आहे. केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी राज्य मंत्री ( स्वतंत्र कार्यभार ) राव इंद्रजीत सिंह, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील. राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाचे अध्यक्ष प्राध्यापक बिमल कुमार रॉय, भारताचे मुख्य संख्याशास्त्रज्ञ आणि सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचे सचिव डॉ जी पी समंथा, भारतीय सांख्यिकी संस्थेच्या संचालक प्रा. संघमित्रा बंडोपाध्याय यांच्यासह इतर मान्यवर कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत.
शाश्वत विकास उद्दिष्टे (एसडीजी) – 2 : (उपासमारीचा अंत, अन्न सुरक्षा साध्य करणे, पोषण सुधारणे आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे ) ही सांख्यिकी दिन 2021 ची संकल्पना आहे.
ऑफिशियल सांख्यिकीसाठी देण्यात येणारा प्राध्यापक पी सी महालनोबीस राष्ट्रीय पुरस्कार आणि युवा संख्याशास्त्रज्ञाला देण्यात येणारा प्रा सी आर राव राष्ट्रीय पुरस्कार या विजेत्यांची नावेही या कार्यक्रमात जाहीर करण्यात येतील.
***
Jaidevi PS/Nilima C/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1730842)
Visitor Counter : 320