विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
इंडियन चेस्ट सोसायटीकडून सीएसआयआर आणि सीएमईआरआय यांच्या ऑक्सिजन संवर्धन तंत्रज्ञानाचे वर्णन '‘मेड इन इंडिया, मेड फॉर इंडिया’
Posted On:
27 JUN 2021 7:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जून 2021
सीएसआयआर-सीएमईआरआय यांच्या संयुक्त विद्यमाने इंडियन चेस्ट सोसायटीतर्फे 'कोविड युगातील आशेचा किरण: ऑक्सिजन' या विषयावर आज एका वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. सीएसआयआर-सीएमईआरआयचे संचालक प्राध्यापक हरीश हिरानी हे या वेबिनारचे प्रमुख वक्ता होते. वेबिनारला डॉ. दीपक तलवार, डॉ. नीरज गुप्ता, डॉ. सुभाकर कंदी आणि डॉ. ध्रुबज्योती रॉय यांसारख्या सुप्रसिद्ध फुफ्फुसतज्ञांची तसेच इंडियन चेस्ट सोसायटीच्या वरीष्ठ सदस्यांची उपस्थिती होती. हे सर्वजण प्रतिष्ठित फुफ्फुसतज्ञ आणि भारतीय चेस्ट सोसायटीचे वरिष्ठ सदस्य आहेत. भारतीय चेस्ट सोसायटीच्या वतीने डॉ. डी. बेहेरा यांनी संपूर्ण आभासी पॅनेल चर्चेचे संचालन केले.
सीएसआयआर-सीएमईआरआयचे संचालक प्रा. हरीश हिरानी यांनी आपल्या बीजभाषणात सांगितले, की मानवी शरीर उच्छवास सोडण्याच्या प्रक्रियेदरम्यान ऑक्सिजनचा भरपूर भाग हवेत सोडतो. हा हाय फ्लो ऑक्सिजन थेरपी दरम्यान उच्छवासातील ऑक्सिजन अशा रितीने शोषला जातो, ज्यामुळे ऑक्सिजनचा भार मोठ्या प्रमाणात कमी होईल. सीएसआयआर-सीएमईआरआय ऑक्सिजन संवर्धन युनिट (ओईयू) ही कार्यक्षमता व्यापून टाकते आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरच्या पलीकडे जाते. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हे भारतीय अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ असल्याने, सीएसआयआर-सीएमईआरआयने त्यांना तंत्रज्ञान आत्मसात करून क्षमता वाढीसाठी आभासी जागरूकता उपक्रमांच्या मालिका आयोजित केल्या आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, तंत्रज्ञान आधीपासूनच भारतभरातील अनेक एमएसएमईंना देण्यात आले आहे, जे या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यास मदत करतील.
सीएसआयआर-सीएमईआरआय प्रगत ऑक्सिजन मास्क तंत्रज्ञानावर कार्य करीत आहे जे व्हायरल लोडच्या या प्रसारापासून संरक्षण प्रदान करेल. यात श्वास घेण्यासाठी आणि उच्छवास सोडण्यासाठी वेगवेगळे हवेचे मार्ग आहेत. पुरवठ्याचा आणि उच्छवास टाकण्याचा मार्ग वेगवेगळा असून तो Co2 स्क्रबर आणि बीव्ही फिल्टरसह सुसज्ज आहे. हा अभिनव प्रयोग उच्छवासित हवेतील ऑक्सिजनच्या पुनर्वापराच्या शक्यतेच्या दिशेने एक पुढचे पाऊल आहे. हे तंत्रज्ञान विलगीकरण/ प्रतिबंधक क्षेत्र यासाठी देखील आदर्श आहेत, जेथे हवेचा पुनःप्रसार करण्यासारख्या वातावरणाची आवश्यकता असते.
ग्रामीण भागामध्ये ऑक्सीजन हॉस्पिटल बेडसाठी प्रगत ओईयू देखील कार्यरत आहेत, ज्यावर स्वतंत्र प्रवाह दर आणि FiO2 यांचे नियंत्रण असेल. सीएसआयआर-सीएमईआरआय, 50 एलपीएम आणि 100 एलपीएम ऑक्सिजन संवर्धन तंत्रज्ञानाच्या हॉस्पिटल विकासाच्या प्रारुपासाठी संशोधन कार्य करीत आहे. विद्यमान रुग्णालयांसाठी आणखी एक हायब्रीड सिस्टम कॉन्फिगरेशन जी पुरेशा ऑक्सिजन सिलेंडर्सच्या साठ्यांसह ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी अंगभूत इंटेलिजेंट कंट्रोलर सिस्टमच्या माध्यमातून हॉस्पिटलच्या ऑक्सिजन सिलिंडर आणि ऑक्सिजन लाइन्ससह कार्य करण्यास सक्षम असेल.
* * *
S.Thakur/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1730747)
Visitor Counter : 272