ऊर्जा मंत्रालय

शाश्वत ऊर्जेसाठी एनटीपीसीने जाहीर केली ऊर्जा उद्दिष्टे

Posted On: 27 JUN 2021 6:21PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जून 2021

 

एनटीपीसी लिमिटेड, ही ऊर्जा मंत्रालयांतर्गत असलेली देशातील सर्वात मोठी वीज निर्मिती करणारी कंपनी, संयुक्त राष्ट्रांच्या ऊर्जाविषयक उच्चस्तरीय परिषदेचा (एचएलडीई) भाग म्हणून, आपली ऊर्जा सघन उद्दिष्टे जाहीर करणारी भारतातील ऊर्जा क्षेत्रातील पहिली कंपनी ठरली  आहे. एनटीपीसीने 2032 पर्यंत 60 गिगावॅट  अक्षय  ऊर्जा क्षमता स्थापित करण्याचे उद्दिष्ट  ठेवले आहे. 2032 पर्यंत निव्वळ ऊर्जा तीव्रतेत 10% नी घट करण्याचे उद्दिष्ट देखील भारतातील सर्वात मोठ्या वीज उत्पादक कंपनीने ठेवले आहे.

आपली ऊर्जा सघन उद्दिष्टे जाहीर करणारी एनटीपीसी ही जागतिक पातळीवरील मोजक्या संस्थांपैकी एक आहे.

स्वच्छ ऊर्जा संशोधन सुलभ करण्यासाठी आणि 2025 पर्यंत शाश्वत ऊर्जा मूल्य साखळीसाठी किमान दोन आंतरराष्ट्रीय आघाड्या/गट तयार करण्याची घोषणा एनटीपीसीने केली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या ‘एचडीएलईसाठीच्या  संबंधित विषयाच्या मंत्रीमंडळ मंचाच्या'  कार्यक्रमात या उद्दिष्टांचे अनावरण करण्यात आले. एनटीपीसीची वचनबद्धता संयुक्त राष्ट्रांच्या संकेतस्थळावर सार्वजनिक करण्यात आली आहे.

शाश्वत विकासासाठी 2030 च्या कार्यसुचीमधील ऊर्जा-संबंधित उद्दीष्टे आणि लक्ष्य यांच्या अंमलबजावणीला प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने संयुक्त राष्ट्रसंघ सप्टेंबर 2021 मध्ये उच्चस्तरीय परिषदेचे आयोजन करणार आहे.

नवीकरणीय  ऊर्जा (आरई) स्त्रोतांची  लक्षणीय क्षमता वाढवून  एनटीपीसी आपली हरित ऊर्जा कर्तव्ये वाढविण्यासाठी विविध पावले उचलत आहे. यापूर्वी कंपनीने नवीकरणीय  ऊर्जा स्त्रोतांद्वारे 2032 पर्यंत  किमान 32 गिगावॅट क्षमतेची  एकूण वीजनिर्मिती क्षमतेच्या 25% उत्पादनाची योजना आखली होती. ही घडामोड देशाच्या सर्वात मोठ्या उर्जा उत्पादकाला मोठी चालना देणारी ठरेल ज्यामुळे  देशाच्या हरित उर्जा नकाशावर आपले दूरगामी  स्थान निश्चित करेल.


* * *

S.Thakur/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1730734) Visitor Counter : 254