आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड - 19 प्रतिबंधक लसीकरण ताजी माहिती


भारत सरकारकडून राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना लसीच्या 31.51 कोटींहून अधिक मात्रांचा पुरवठा

राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांकडे अद्याप लसीच्या 1.15 कोटींहून अधिक मात्रा लसीकरणासाठी उपलब्ध

प्रविष्टि तिथि: 27 JUN 2021 10:24AM by PIB Mumbai

देशभरात कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाची गती आणि व्याप्ती वाढविण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या  नव्या टप्प्याला 21 जून 2021 पासून सुरुवात झाली. लसीकरणाचे अधिक उत्तम नियोजन करण्यासाठी आणि लसींची पुरवठा साखळी सुरळीत राखण्याच्या दृष्टीने , राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना लसींची अधिक प्रमाणात उपलब्धता, लस उपलब्धतेची आगाऊ पूर्वसूचना याद्वारे लसीकरण मोहिमेला गती देण्यात आली आहे.

देशव्यापी  लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून,  भारत सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीचा  विनामूल्य पुरवठा करून सहकार्य करत आहे.  कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण अभियानाच्या सार्वत्रिकीकरणाच्या नव्या टप्यात केंद्र सरकार, देशातील  लस उत्पादकांकडून उत्पादित 75% लसी खरेदी करून त्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना विनामूल्य पुरवणार आहेत.  

 

विनामूल्य  आणि  राज्यांकडून थेट  खरेदी अशा दोन्ही श्रेणीच्या माध्यमातून  भारत सरकारने आतापर्यंत राज्य सरकार / केंद्रशासित प्रदेशांना लसीच्या 31.51 कोटींहून (31,51,43,490) अधिक मात्रा पुरवल्या आहेत.

(आज सकाळी 8 वाजेपर्यंत उपलब्ध माहितीनुसार ), यापैकी वाया गेलेल्या मात्रांसह एकूण 30,35,97,466 मात्रा देण्यात आल्या आहेत

राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही 1.15 कोटींहून (1,15,46,024) अधिक कोविड प्रतिबंधक लसीच्या मात्रांचा साठा लसीकरणासाठी उपलब्ध आहेत.

याव्यतिरिक्त, आगामी 3 दिवसात लसीच्या 20,48,960 मात्रा राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना प्राप्त होतील.

***

MC/SC/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1730667) आगंतुक पटल : 215
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Malayalam , English , Urdu , हिन्दी , Bengali , Punjabi , Odia , Tamil , Telugu , Kannada