संरक्षण मंत्रालय

युरोप आणि आफ्रिकेतील मित्रदेशां बरोबर आयएनएस तबर करणार संयुक्त नौदल सराव

Posted On: 26 JUN 2021 9:07PM by PIB Mumbai

 

मित्र राष्ट्रांबरोबर सामरिक सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने भारतीय युद्धनौका आयएनएस तबर तैनात केली असून. या अंतर्गत 13 जून रोजी तिचा सुरु झालेला प्रवास युरोप आणि आफ्रिकेतील विविध बंदरांना भेट देत सप्टेंबर अखेरपर्यंत चालणार आहे. बंदरांच्या भेटीदरम्यान व्यावसायिक, सामाजिक आणि क्रीडा विषयक कार्यक्रमात तबर सहभागी होईल. याबरोबरच मित्र राष्ट्रांच्या नौदलांबरोबर संयुक्त सरावातही तबर भाग घेणार आहे.

तैनातीच्या या काळात आएनएस तबर, जीबुती, इजिप्त, इटली, फ्रान्स, इंग्लड, रशिया, नेदरलँड, मोरोक्को आणि आर्क्टिक परिषदेच्या  स्वीडन, नॉर्वे यासारख्या देशातील बंदरांना भेट देत एडनचे आखात, लाल समुद्र, सुएझ कालवा, भूमध्य समुद्र, उत्तर सागर आणि बाल्टिक समुद्र पार करणार आहे.

यजमान देशांबरोबरच्या सरावासह शाही नौदला बरोबर  कोकण, फ्रेंच नौदला बरोबर  वरुणा आणि रशियन महासंघाच्या नौदला सोबत इंद्र या द्विपक्षीय युद्धसरावातही तबर युद्धनौका भाग घेणार आहे. तबर, 22 ते 27 जुलै याकाळात रशिया नौदल दिवस सोहळ्यातही सहभागी होईल.

सामरिक संबंध दृढ करणे, आंतर- परिचालनक्षमता  विकसित करणे आणि दीर्घ शाश्वत भागीदारीसाठी  मित्र राष्ट्रांच्या नौदलांच्या समन्वयाने तबर काम करणार आहे. सागरी क्षेत्रातील हित जपण्याला प्राधान्य देत भारतीय नौदलाकडून नियमितपणे अशी जहाजे तैनात केली जातात. सागरी क्षेत्रातील आव्हानां विरोधात एकत्रित कारवाई करणे आणि प्रदेशात सागरी सुरक्षा वाढवणे हा या प्रकारच्या सरावांचा उद्देश असतो. याप्रकारचे परस्पर संयोजन हा एकमेकांच्या नौदलातील सर्वोत्तम पद्धतींचे निरीक्षण करण्याची आणि त्या आत्मसात करण्याचीही संधी देतात.

आयएनएस तबर ही तलवार श्रेणीतली युद्धनौका असून तिची बांधणी भारतीय नौदलासाठी रशियात झाली आहे.  युद्धनौकेचे प्रमुख कॅप्टन एम महेश असून त्यांच्या नेतृत्वाखाली 300 जण कार्यरत आहेत. अत्याधुनिक शस्त्रास्त्र आणि सेन्सर्सने ही सज्ज असून भारतीय नौदलातील सर्वात आधीच्या स्टिल्थ फ्रिगेट मधील आहे.  मुंबईत मुख्यालय असलेल्या नौदलाच्या पश्चिम विभागा अंतर्गत भारतीय नौदलाच्या पश्चिम फ्लीटचा, तबर भाग आहे.

***

S.Patil/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1730591) Visitor Counter : 247