आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

अश्विनीकुमार चौबे यांनी घेतली कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीची दुसरी मात्रा

Posted On: 24 JUN 2021 6:32PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 जून 2021

 

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे आणि त्यांच्या पत्नी नीता चौबे यांनी आज नवी दिल्लीतल्या  एम्स येथे कोविड 19  प्रतिबंधात्मक लसीची दुसरी मात्रा घेतली. 

प्रत्येक पात्र व्यक्तीने  लस घ्यावी असे  आवाहन त्यांनी केले.  “ही लस आपली  संरक्षक ढाल आहे. कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईत ती आपल्या शरीराची  सुरक्षा बळकट करणारी आहे.  या साथीपासून आपले संरक्षण  करण्यासाठी आपले  व आपल्या प्रियजनांचे  लसीकरण करून घ्यावे,अशी विनंती मी देशवासीयांना करतो.” असे चौबे यांनी म्हटले आहे. 

''लसीकरणासोबतच कोविड काळात अनुरूप वर्तन राहील, याची काटेकोर काळजी घेण्याची विनंती मी करतो'',असे त्यांनी म्हटले आहे. ''लसीकरणात सहभागी होण्यासोबतच  या नियमांचे  पालन करणे, कोविडविरुद्ध जनआंदोलनातले महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. नेहमी लक्षात ठेवा, दवाई भी, कडाई  भी !” असे चौबे यांनी सांगितले. 

 

* * *

M.Chopade/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1730099) Visitor Counter : 252