PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित बातमीपत्र
Posted On:
23 JUN 2021 6:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली/मुंबई 23 जून 2021
- India administered 54.24 lakh vaccine doses in the last 24 hours
- 29.46 Cr. Vaccine Doses administered so far under Nationwide Vaccination Drive
- India reports 50,848 new cases in the last 24 hours
- India's Active Caseload declines to 6,43,194; lowest in 82 days
- 2,89,94,855 Total Recoveries across the country so far
- 68,817 patients recovered during the last 24 hours
- Daily recoveries continue to outnumber the Daily New Cases for the 41st consecutive day
- Recovery Rate increases to 96.56%
- Weekly Positivity Rate remains below 5%, currently at 3.12%
- Daily positivity rate at 2.67%, less than 5% for 16 consecutive days
|
#Unite2FightCorona#IndiaFightsCorona
PRESS INFORMATION BUREAU
MINISTRY OF INFORMATION & BROADCASTING
GOVERNMENT OF INDIA
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 शी संबंधित घडामोडींवरील माहिती
आणखी एका महत्वाच्या घडामोडीत, कोरोना प्रतिबंधक लसीकरणामध्ये भारताने काल 29 कोटीचा टप्पा पार केला आहे. आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण 39,49,630 सत्रांद्वारे 29,46,39,511 मात्रा देण्यात आल्या आहेत.गेल्या 24 तासात 54,24,374 मात्रा देण्यात आल्या.
यामध्ये समावेश आहे-
HCWs
|
1st Dose
|
1,01,45,382
|
2nd Dose
|
71,14,021
|
FLWs
|
1st Dose
|
1,72,70,889
|
2nd Dose
|
91,37,511
|
Age Group 18-44 years
|
1st Dose
|
6,59,41,855
|
2nd Dose
|
14,28,117
|
Age Group 45-59 years
|
1st Dose
|
8,28,91,130
|
2nd Dose
|
1,31,57,562
|
Over 60 years
|
1st Dose
|
6,56,45,248
|
2nd Dose
|
2,19,07,796
|
Total
|
29,46,39,511
|
21 जून 2021 पासून कोविड-19 सार्वत्रिक लसीकरणाचा नवा टप्पा सुरु झाला आहे. देशभरात कोविड लसीकरणाचा वेग आणि व्याप्ती वाढवण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध आहे. गेल्या 24 तासात 50,848 नव्या रुग्णांची नोंद झाली.
सलग 16 व्या दिवशी 1 लाखापेक्षा कमी नव्या दैनंदिन रुग्णांची नोंद झाली. केंद्र आणि राज्य सरकार/ केंद्रशासित प्रदेशांच्या समन्वित प्रयत्नांचा हा परिपाक आहे.
देशात उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतही सातत्याने घट होत आहे. आज उपचाराधीन रुग्णांची संख्या 6,43,194 होती. 82 दिवसातली ही सर्वात कमी संख्या आहे.
कोविड-19 मधून अधिकाधिक रुग्ण बरे होत असल्याने सलग 41 व्या दिवशी दैनंदिन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. गेल्या 24 तासात 68,817 रुग्ण कोरोना मुक्त झाले.
महामारीच्या सुरवातीपासून कोरोनाची लागण झालेल्यांपैकी एकूण 2,89,94,855 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. कोरोनातून बरे होण्याचा दर 96.56% असून याचा आलेख चढता आहे.
देशाच्या कोरोना चाचण्या करण्याच्या क्षमतेत वाढ होत असून गेल्या 24 तासात 19,01,056 चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत 39.59 कोटी (39,59,73,198) चाचण्या करण्यात आल्या.
देशात चाचण्या वाढवण्यात आल्या असताना साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर सातत्याने खाली येत आहे. सध्या साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर 3.12% आणि आज दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर 2.67% आहे. सलग 16 व्या दिवशी हा दर 5% पेक्षा कमी आहे.
इतर अपडेटस्
· राज्ये/केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही 1.92 कोटींपेक्षा जास्त (1,92,00,465) मात्रांचा साठा उपलब्ध आहे. याशिवाय येत्या 3 दिवसात लसीच्या 39,07,310 मात्रा राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना प्राप्त होतील.
- को-विन प्लॅटफॉर्म ही सर्वसमावेशक आयटी प्रणाली आहे, जी देशाच्या दुर्गम भागात तसेच सर्वाधिक असुरक्षित भागात लसीकरण सुलभ करण्यासाठी सर्व आवश्यक वैशिष्ट्यांसह एक लवचिक व्यवस्था प्रदान करते. नऊ ओळखपत्रांपैकी आधार, मतदार ओळख पत्र, फोटोसह रेशन कार्ड, दिव्यांग ओळखपत्र यापैकी एक ओळखपत्र, लसीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहे, मात्र ज्यांच्याकडे या नऊ पैकी एकही ओळखपत्र नाही किंवा मोबाईल फोन नाही त्यांच्यासाठी लसीकरण सत्र आयोजित करण्याची विशेष तरतूद केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. या तरतुदींचा पूर्ण लाभ घेत आतापर्यंत अशा 2 लाखाहून अधिक लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे. वृद्ध आणि अपंग व्यक्तींसाठी घराजवळ लसीकरण केंद्र सेवा देखील पुरवली जात आहे.
- कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसारच्या लसीकरणाच्या पहिल्या दिवशी, सोमवारी (21 जून 2021) देण्यात आलेल्या लसीच्या एकूण मात्रांपैकी 63.68% मात्रा ग्रामीण भागात देण्यात आल्या आहेत. त्या दिवशी देण्यात आलेल्या मात्रांपैकी 56.09 लाख मात्रा ग्रामीण लसीकरण केंद्रातून देण्यात आल्या तर शहरी भागात 31.9 लाख लोकांनी लस घेतली.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रीमंडळ बैठकीत, प्रधान मंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत (चौथा टप्पा) राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंबा) अंतर्गत कमाल 81.35 कोटी लाभार्थींना, ज्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणा अंतर्गत येणाऱ्यांचा समावेश आहे, अशांना आणखी पाच महिने म्हणजेच जुलै ते नोव्हेंबर 2021 या काळासाठी दरमहा प्रती व्यक्ती 5 किलो मोफत अतिरिक्त धान्य देण्याला मंजुरी दिली आहे.
- केंद्रीय रसायन आणि खते मंत्री डी.वी.सदानंद गौडा यांनी घोषणा केली आहे की म्यूकरमायकोसिस वरील उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या लिपोसोमल एम्फोटेरिसिन बी इंजेक्शनच्या अतिरिक्त 61,120 कुप्या सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना आणि केंद्रीय संस्थाना आज वितरित करण्यात आल्या आहेत.
- आतापर्यंत देशभरात सुमारे 7.9 लाख कुप्या वितरित करण्यात आल्या असून म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांना पुरेसा साठा उपलब्ध करण्यात आला आहे असे गौडा म्हणाले.
महाराष्ट्र अपडेट्स :-
कोविड -19 मुक्त गावांमध्ये ऑफलाइन वर्ग पुन्हा सुरू करण्याचा महाराष्ट्र सरकारचा विचार आहे. शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या गावांमध्ये इयत्ता दहावी व बारावीचे ऑफलाइन वर्ग पुन्हा सुरू करण्याबाबत चाचपणी करायला सांगितले. राज्याच्या शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली की कोविड -19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या इयत्ता 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलण्याची योजना सरकार आखत आहे.. ठाकरे यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत निधीच्या आवश्यकतेनुसार मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यास सांगितले. मंगळवारी राज्यात सुमारे 5.6 लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यन्त 2.87 कोटी लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. त्यापैकी 2.30 कोटींना पहिली मात्रा आणि 56 लाख लोकांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. मुंबईत 48.66 लाखाहून अधिक लाभार्थीचे लसीकरण झाले आहे तर पुण्यात. 38.84 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.
गोवा अपडेट्स:-
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घोषणा केली आहे की सरकार ना नफा तत्वावर चालणाऱ्या शैक्षणिक संस्थांना वापरात नसलेल्या शाळांचा परिसर देईल.
गोव्यात 303 कोविड -19 बाधित रुग्ण आढळल्यामुळे एकूण बाधितांची संख्या 1,64,957 वर पोहोचली आहे, तर 11 नवीन मृत्युंसह मृत्यूमुखी पडणाऱ्यांचा एकूण आकडा 3,008 वर पोहचला आहे.
https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png
https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg
India administered 54.24 lakh vaccine doses in the last 24 hours
29.46 Cr. Vaccine Doses administered so far under Nationwide Vaccination Drive
India reports 50,848 new cases in the last 24 hours
India's Active Caseload declines to 6,43,194; lowest in 82 days
2,89,94,855 Total Recoveries across the country so far
68,817 patients recovered during the last 24 hours
Daily recoveries continue to outnumber the Daily New Cases for the 41st consecutive day
Recovery Rate increases to 96.56%
Weekly Positivity Rate remains below 5%, currently at 3.12%
Daily positivity rate at 2.67%, less than 5% for 16 consecutive days
#Unite2FightCorona#IndiaFightsCorona
PRESS INFORMATION BUREAU
MINISTRY OF INFORMATION & BROADCASTING
GOVERNMENT OF INDIA
Image
Image
Image
https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image0020FX3.png
https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001BPSF.jpg
India administered 54.24 lakh vaccine doses in the last 24 hours
29.46 Cr. Vaccine Doses administered so far under Nationwide Vaccination Drive
India reports 50,848 new cases in the last 24 hours
India's Active Caseload declines to 6,43,194; lowest in 82 days
2,89,94,855 Total Recoveries across the country so far
68,817 patients recovered during the last 24 hours
Daily recoveries continue to outnumber the Daily New Cases for the 41st consecutive day
Recovery Rate increases to 96.56%
Weekly Positivity Rate remains below 5%, currently at 3.12%
Daily positivity rate at 2.67%, less than 5% for 16 consecutive days
#Unite2FightCorona#IndiaFightsCorona
PRESS INFORMATION BUREAU
MINISTRY OF INFORMATION & BROADCASTING
GOVERNMENT OF INDIA
Image
Image
Image
***
S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1729901)
Visitor Counter : 255