वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
एप्रिल 2021 मध्ये भारताने एकूण 6.24 अब्ज अमेरिकन डॉलर थेट परकीय गुंतवणूक आकर्षित केली
एप्रिल 2020 च्या तुलनेत एकूण एफडीआय ओघ 38% अधिक आहे;
एफडीआय इक्विटी गुंतवणूक 60% वाढून 4.44 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी झाली ;
एफडीआयचा ओघ म्हणजे जागतिक गुंतवणूकदारांच्या पसंतीचे गुंतवणूक केंद्र म्हणून भारताच्या दर्जाला मिळालेली मान्यता आहे
Posted On:
23 JUN 2021 7:32PM by PIB Mumbai
थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) धोरणात सुधारणा, गुंतवणूकीची सुविधा आणि व्यवसाय सुलभता या आघाड्यांवर केंद्र सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे देशात थेट परकीय गुंतवणूकीचा ओघ वाढला आहे. भारताच्या थेट परकीय गुंतवणूकीमधील खालील कल ही जागतिक गुंतवणूकदारांमध्ये पसंतीचे गुंतवणूक केंद्र भारताच्या दर्जाला मिळालेली मान्यता आहे:
एप्रिल 2021 मध्ये भारताने 6.24 अब्ज अमेरिकन डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक आकर्षित केली आणि ती एप्रिल 2020 च्या (US$4.53 ) तुलनेत 38% जास्त आहे.
एप्रिल 2021 मध्ये देशात इक्विटीचा ओघ 4.44 अब्ज डॉलर्स इतका नोंदवला गेला होता, जो एप्रिल 2020 च्या (US$ 2.77 अब्ज ) तुलनेत 60 टक्क्यांनी वाढला आहे.
एप्रिल 2021 मध्ये एफडीआय इक्विटीच्या 24% गुंतवणूकीसह मॉरिशस सर्वाधिक गुंतवणूक करणारा देश आहे, त्याखालोखाल सिंगापूर (21%) आणि जपान (11%) आहे.
एप्रिल 2021 मध्ये ‘संगणक सॉफ्टवेअर व हार्डवेअर’ हे अव्वल क्षेत्र म्हणून उदयास आले असून एकूण एफडीआय इक्विटी प्रवाहात त्याचा वाटा सुमारे 24% आहे, त्याखालोखाल सेवा क्षेत्र (23%) आणि शिक्षण क्षेत्र (8%) आहे.
एप्रिल 2021 मध्ये कर्नाटकमध्ये सर्वाधिक गुंतवणूक आली. जी एकूण एफडीआय इक्विटीच्या 31% आहे, त्याखालोखाल महाराष्ट्र (19 %) आणि दिल्ली (15 टक्के ) आहे.
***
S.Patil/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1729841)
Visitor Counter : 343