संरक्षण मंत्रालय
युरोपीय युनियन-भारत संयुक्त नौदल सराव
Posted On:
21 JUN 2021 5:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जून 2021
युरोपीय युनियन आणि भारताने 18-19 जून 2021 रोजी एडनच्या आखातात संयुक्त नौदल सराव केला. सरावात भारताची जलदगती संरक्षक नौका आयएनस त्रिकंद, ईयूएनएव्हीएफओआर- सोमालिया, अॅटलांटा मोहिमेतील प्रमुख सहभागी, यात इटलीची संरक्षक नौका कॅरेबिनिएर (अॅटलांटा फ्लॅगशीप), स्पेनची संरक्षक नौका नावार्रा, फ्रान्सची संरक्षक नौका सुरकॉफ आणि फ्रान्सचे महत्वाकांक्षी अॅसॉल्ट हेलिकॉप्टर कॅरियर टोनेरे यांचा सहभाग होता. समुद्री चाच्यांच्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर या सरावाचे आयोजन केले होते. क्रॉस डेक हेलिकॉप्टर लँडींग्स, समुद्रातील जटील रणनीती व्यूह, गोळ्या आणि दारुगोळ्यांचा प्रत्यक्ष मारा, सोमालिया तटावर समुद्रात रात्रीची संयुक्त गस्त आणि नौदल संचलन यांचा सरावात अंतर्भाव होता.
भारतीय-प्रशांत क्षेत्रात मुक्त, खुल्या आणि सर्वसमावेशक कायदेशीर वातावरण उपलब्ध करण्यासाठी युरोपीय युनियन आणि भारत वचनबद्ध आहे. या भागातील अखंडता, सार्वभौमत्व, लोकशाही, कायदा सुव्यस्था, पारदर्शकता, जलवाहतुकीचे स्वातंत्र्य आणि उड्डाणाचे स्वातंत्र्य, खुला कायदेशीर व्यापार आणि वादाचे शांततेच्या मार्गाने निरसन यासाठी कटिबद्ध आहे. संयुक्त राष्ट्राच्या समुद्री कायद्यासह (UNCLOS) आंतरराष्ट्रीय कायद्यांना सर्वोतोपरी मानत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
युरोपीय युनियन आणि भारताने जानेवारी 2021 मधे सागरी सुरक्षा क्षेत्रा संदर्भातील संवादाला सुरुवात केली. या क्षेत्रात संवाद आणि सहकार्य अधिक दृढ करण्यावर उभयतांमधे सहमती झाली. ईयू एनएव्हीएफओआर सोमालिया - अटलांटा मोहिमेच्या समन्वयाने सुरु असलेल्या जागतिक अन्न कार्यक्रमाच्या चार्टर्ड जहाजांना भारतीय नौदल सुरक्षा पुरवत आहे. भारतीय नौदलाने या आधी जनजागृती आणि वाद निरसनासाठी समन्वय (SHADE) परिषदेत भाग घेतला होता. याचे सहयजमान अटलांटा मोहिम होती. त्यांच्यासह भारतीय जहाजांनी या आधी अनेक संयुक्त सरावात भाग घेतला होता.
युरोपीय युनियन आणि भारताला सागरी सहकार्य वाढवायचे आहे. यात संयुक्त नौदल सराव, बंदरांशी संपर्क आणि सागर मार्गिका संप्रेषण सुरक्षा यांचा समावेश आहे. भारत-प्रशांत महासागर क्षेत्रात परस्पर सहकार्य आणि देवाणघेवाणीतून सागरी क्षेत्राबाबत जागृतीला प्रोत्साहन देण्याचा मनोदय देखील त्यांनी व्यक्त केला. भारत- प्रशांत क्षेत्रात सागरी सुरक्षेसाठी सहकार्य वाढवण्यावरही युरोपीय युनियन आणि भारताने भर दिला.
* * *
M.Iyengar/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1729103)
Visitor Counter : 297