ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय
अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने अन्न सुरक्षा (राज्य सरकारांना सहाय्य नियम) 2015 मध्ये सुधारणा अधिसूचित केली
Posted On:
21 JUN 2021 4:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 जून 2021
अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 अंतर्गत पात्रतेनुसार लाभार्थ्यांना अनुदानित धान्य वितरणाचे योग्य प्रमाण सुनिश्चित करण्यासाठी 18 जून 2021 रोजी एक अधिसूचना जारी केली आहे.
जी राज्ये ईपीओएस ( ePoS) योग्यप्रकारे वापरत आहेत आणि त्यांना पुरविल्या जाणाऱ्या 17 रुपये प्रति क्विंटल अतिरिक्त मार्जिनमधून बचत करत आहेत अशा राज्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत लक्ष्यित सार्वजनिक वितरण प्रणालीच्या कार्यात पारदर्शकता सुधारण्यासाठी सुधारणा प्रक्रिया पुढे नेण्यासाठी अन्न सुरक्षा (राज्य सरकारांना सहाय्य नियम) 2015 च्या पोट-नियम (2) मधील नियम 7 मध्ये 18 जून , 2021पासून सुधारणा करण्यात आली आहे जेणेकरून कोणत्याही राज्य / केंद्र शासित प्रदेशाना पॉईंट ऑफ सेल उपकरणाची खरेदी, परिचालन आणि देखभाल, त्याचा खर्च आणि त्याच्या वापरासाठी प्रोत्साहन म्हणून दिल्या जाणाऱ्या अतिरिक्त मार्जिनमधून होणाऱ्या बचतीचा उपयोग यापुढे इलेक्ट्रॉनिक तराजूंच्या खरेदी, परिचालन आणि देखभाल आणि पीओएस एकत्रिकरण यासाठी करता येईल. यामुळे इतर राज्यांना ईपीओएस उपकरणाचा योग्य वापर करुन बचत करण्यास प्रोत्साहन मिळेल.
Click here for Gazette notification
* * *
M.Chopade/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1729088)
Visitor Counter : 186