श्रम आणि रोजगार मंत्रालय
अखिल भारतीय सर्वेक्षण विभागातर्फे प्रमुख प्रशिक्षक आणि पर्यवेक्षकांसाठी तीन दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम
Posted On:
19 JUN 2021 9:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जून 2021
कोविड 19 महामारी कालखंडात श्रम विभागाकडून राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आर्थिक आणि सांख्यिकी महासंचालनालयानी नामांकन केलेल्या प्रमुख प्रशिक्षक व द्वितिय स्तरावरील पर्यवेक्षक यांच्यासाठी तीन दिवसीय ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होते. अखिल भारतीय स्थलांतरित मजूर सर्वेक्षण आणि अखिल भारतीय त्रैमासिक आस्थापना आधारित रोजगार सर्वेक्षण या दोन सर्वेक्षणांसाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. श्रम विभागाकडून आयोजित करण्यात आलेला संपूर्ण देशपातळीवरील हा दुसरा प्रशिक्षण कार्यक्रम आहे. या आधी या प्रकारचा कार्यक्रम एप्रिल 2021 मध्ये तपासनीसांसाठी आयोजित करण्यात आला होता.
श्रम विभागाचे महासंचालक डी पी एस नेगी यांनी 16 जून रोजी या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन केले. उद्घाटनानंतर एक्स्पर्ट समूहाचे अध्यक्ष एस.पी. मुखर्जी यांचे भाषण झाले. एस पी मुखर्जींनी सहभागी व्यक्तींशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला व अखिल भारतीय स्तरावरील पाच सर्वेक्षणांची ओळख करून देत त्यांचे महत्त्व सांगितले.
हे सर्वेक्षण आणि संबंधित क्षेत्रातील त्यांच्या परिचालन पद्धती तसेच या सर्व सर्वेक्षण विभागांमधील समन्वय आणि देखरेख या कामी आर्थिक आणि सांख्यिकी महासंचालनालयाची भूमिका नेगी यांनी विशद केली.
या सर्वेक्षणांतर्गत टॅबलेट किंवा संगणकाच्या मदतीने घेतलेल्या मुलाखतीच्या आधारे माहिती गोळा केली जाईल असे या प्रशिक्षणार्थींना सांगण्यात आले. दर्जेदार आणि विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी या माहिती तंत्रज्ञान आधारित उपकरणांमध्ये द्विस्तरीय पर्यवेक्षण करण्यात येईल, अशी माहिती त्यांना देण्यात आली.
सर्वेक्षणात सहभागी असणाऱ्या संस्थांकडून पहिल्या स्तरावरील पर्यवेक्षण केले जाईल. त्यानंतर श्रम विभागाचे अधिकारी व राज्यस्तरीय अधिकाऱ्यांकडून त्याची छाननी केली जाईल. या देशव्यापी सर्वेक्षणासाठी श्रम विभागाची सर्वेक्षण भागिदार असलेली ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट्स इंडिया लिमिटेड ही कंपनी माहिती तंत्रज्ञान पर्यवेक्षण तसेच मानव संसाधनाच्या संदर्भातील सहाय्य करते.
हा प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाइन मंचावरून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजित केला होता. प्रत्येक दिवशी 700 पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थींनी या प्रशिक्षण कार्यक्रमात उपस्थिती नोंदवली.
कार्मिक आणि रोजगार मंत्रालयाचे सचिव अपूर्व चंद्र यांनी भारत सरकारच्या दृष्टिकोनातून देशातील कामगारांसाठी ठोस धोरणे राबवण्याच्या दृष्टीने या सर्वेक्षणाचे महत्त्व यावेळी विशद केले.
* * *
S.Patil/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1728674)
Visitor Counter : 287