ऊर्जा मंत्रालय
एनटीपीसी - आर्थिक वर्ष 21 लेखापरीक्षणाचे निष्कर्ष -आतापर्यंतचा सर्वोच्च करपश्चात नफा (पीएटी) 36.16%
Posted On:
19 JUN 2021 7:42PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जून 2021
ऊर्जा मंत्रालयांतर्गत महारत्न श्रेणीतील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि देशातील सर्वात मोठी वीज उत्पादक आणि 65825 मेगावॅटची विद्यमान स्थापित क्षमता असलेल्या एनटीपीसी लिमिटेडने आर्थिक वर्ष 2021चे आर्थिक निष्कर्ष तसेच आर्थिक वर्ष 2021 च्या चौथ्या तिमाहीसाठी बिगर लेखापरीक्षित आर्थिक निष्कर्ष जाहीर केले.
एनटीपीसी समूहाने मागील वर्षीच्या 290.19 अब्ज युनिट्सच्या तुलनेत आर्थिक वर्ष 21 मध्ये सर्वाधिक 314.07 अब्ज युनिट उत्पादन नोंदवले. स्टॅन्ड अलोन आधारे आर्थिक वर्ष 21 मध्ये एनटीपीसीची एकूण वीज निर्मिती 270.91 अब्ज युनिट होती, जी मागील वर्षी 259.62 अब्ज युनिट होती. कोळसा केंद्रांनी 91.43 टक्के उपलब्धता फॅक्टरसह 54.56% राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत 66 % प्लांट लोड फॅक्टर साध्य केले.
एनटीपीसीने वर्षभरात बिलाच्या रकमेच्या 100% पेक्षा जास्त रक्कम वसूल केली असून, एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे जी आतापर्यंतची सर्वाधिक वसूली आहे.
आर्थिक वर्ष 21, मध्ये एकूण उत्पन्न 3.06 टक्क्यांनी वाढून 103,552.71 कोटी रुपये झाले ,जे आर्थिक वर्ष 20 मध्ये,100,478.41 कोटी रुपये होते
आर्थिक वर्ष 21, मध्ये एनटीपीसीने सर्वाधिक 13,769.52 कोटी रुपये करोत्तर नफा नोंदवला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत 36.16% वाढ झाली आहे, गेल्या वर्षी 10,112.81 कोटी रुपये नफा झाला होता.
एनटीपीसी लिमिटेडच्या संचालक मंडळाने पेड-अप समभाग भांडवलाच्या 31.5 % म्हणजे 10 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रत्येक समभागासाठी 3 रुपये 15 पैसे अंतिम लाभांश देण्याची शिफारस केली आहे,ज्यासाठी सर्वसाधारण सभेत भागधारकांची मान्यता आवश्यक आहे. कंपनीने फेब्रुवारी 2021 मध्ये पेड-अप समभाग भांडवलाच्या @30% म्हणजेच प्रत्येक समभागासाठी 3 रुपये अंतरिम लाभांश दिलेला आहे. कंपनीकडून सलग 28 व्या वर्षी लाभांश जाहीर झाला आहे.
* * *
S.Patil/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1728635)
Visitor Counter : 194