आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड-19 लसीकरण अद्ययावत माहिती


राज्यें व केंद्रशासित प्रदेशांना लसींच्या 28.50 कोटींपेक्षा जास्त मात्रा वितरीत.

राज्ये व केंद्रशासित प्रदेशांकडे 2.87 कोटी लस मात्रा शिल्लक

Posted On: 19 JUN 2021 6:09PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 जून 2021

 

संपूर्ण देशभरात राबवण्यात येत असलेल्या लसीकरण कार्यक्रमाचा भाग म्हणून केंद्र सरकार राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना विनामुल्य लसपुरवठा करत आहे. याशिवाय राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना लसी थेट उपलब्ध व्हाव्यात म्हणूनही केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. महामारीला आळा घालण्याच्या तसेच महामारीसंबधीत व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातून सर्वसमावेशक धोरणाचा निदानचाचण्या,  संसर्गाचा माग काढणे, उपचार आणि कोविड-सुसंगत आचरण याशिवाय लसीकरण हा मुख्य आधार आहे.

कोविड लसीकरणाचे मुक्त आणि वेगवान फेज-3 धोरण 1 मे 2021 पासून सुरू झाले.

या धोरणानुसार प्रत्येक महिन्यात एकूण केंद्रीय औषध प्रयोगशाळेने मान्यता दिलेल्या कोणत्याही उत्पादकाच्या एकूण लसीच्या मात्रेपैकी निम्म्या मात्रा केंद्र  सरकार घेईल. आधी प्रमाणेच राज्य सरकारांना विनामुल्य लस पुरवठा करण्यासाठी या लसींचा उपयोग होईल.

राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारकडून विनामूल्य तसेच थेट प्रकारे आतापर्यंत 28.50 कोटी (28,50,99,130) लसींच्या मात्रा विनामुल्य पुरवण्यात आल्या आहेत. 

आज सकाळी 8 वाजता उपलब्ध झालेल्या माहितीनुसार यापैकी वाया गेलेल्या मात्रा धरून 25,63,28,045 मात्रा वापरल्या गेल्या आहेत.

2.87 कोटींहून जास्त म्हणजेच 2,87,71,085 कोविड लसींच्या मात्रा अजूनही राज्यांकडे वा केंद्रशासित प्रदेशांकडे वापरासाठी शिल्लक आहेत.

याशिवाय 52,26,460 पेक्षा जास्त लसींच्या मात्रा उपलब्ध होणार आहेत आणि पुढील तीन दिवसांमध्ये त्या राज्यांना तसेच केंद्रशासित प्रदेशांना वितरीत होतील.

 

* * *

Jaydevi PS/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1728595) Visitor Counter : 149