रेल्वे मंत्रालय

ऑक्सिजन एक्सप्रेसने देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये 18000 मेट्रिक टन एलएमओ पोहचवून महत्वपूर्ण टप्पा ओलांडला


ऑक्सिजन एक्सप्रेस द्वारे आतापर्यंत देशभरात 32464 मेट्रिक टन पेक्षा अधिक एलएमओ वितरीत

448 ऑक्सिजन एक्सप्रेसनी देशभरात ऑक्सिजन पोहचवण्याचा प्रवास पूर्ण केला

ऑक्सिजन एक्सप्रेसनी आतापर्यंत एलएमओच्या 1854 टँकर्सची वाहतूक केली आणि 15 राज्यांना दिलासा दिला

Posted On: 19 JUN 2021 2:47PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 जून 2021

 

सर्व अडथळ्यांवर मात करत आणि नवीन उपाय शोधून भारतीय रेल्वे द्रवरूप मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) देशभरातील विविध राज्यात पोहचवून दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे.

ऑक्सिजन एक्सप्रेसने देशाची सेवा बजावताना 32400 मे.टन द्रवरूप मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) पोहचवत महत्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे.

आतापर्यंत भारतीय रेल्वेने देशातील विविध राज्यांत 1854  पेक्षा जास्त टँकरद्वारे सुमारे 32464 मेट्रिक टन एलएमओ पोहचवला आहे.

हे नमूद केले जात आहे की आतापर्यंत 448 ऑक्सिजन एक्सप्रेसनी आपला प्रवास पूर्ण केला आहे आणि विविध राज्यांना दिलासा दिला आहे.

हे उल्लेखनीय आहे की ऑक्सिजन एक्सप्रेसनी देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये 18000 मे.टन एलएमओ वितरणाचा टप्पा ओलांडला.

आतापर्यंत ऑक्सिजन एक्स्प्रेसने तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यात अनुक्रमे 3300, 4100, 4300 आणि 5600 मेट्रिक टन पेक्षा अधिक एलएमओ पोहचवला आहे.

ही बातमी प्रकाशित होईपर्यंत 8 टँकरमधून 153 मे.टन पेक्षा जास्त एलएमओ घेऊन 2 ऑक्सिजन एक्सप्रेस धावत आहेत.

उल्लेखनीय आहे की ऑक्सिजन एक्स्प्रेसने 56 दिवसांपूर्वी 24 एप्रिल रोजी प्रथमच महाराष्ट्रात 126 मे.टन एलएमओ पोहचवून सुरुवात केली होती.

गरजू राज्यांना कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त एलएमओ पोहोचवण्याचा भारतीय रेल्वेचा प्रयत्न आहे.

ऑक्सिजन एक्स्प्रेसने 15 राज्यांना ऑक्सिजन दिलासा दिला आहे. यात उत्तराखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू, हरियाणा, तेलंगणा, पंजाब, केरळ, दिल्ली, उत्तर प्रदेश, झारखंड आणि आसाम यांचा समावेश आहे.

ही बातमी प्रसिद्ध होईपर्यंत महाराष्ट्रात 614 मे.टन ऑक्सिजन, उत्तर प्रदेशात सुमारे 3797 मेट्रिक टन, मध्य प्रदेशात 656 मेट्रिक टन , दिल्लीमध्ये  5722 मेट्रिक टन, हरियाणामध्ये  2354 मे.टन, राजस्थानमध्ये 98 मे टन , कर्नाटकात  4333  मे. टन , उत्तराखंडमध्ये  320 मेट्रिक टन, तामिळनाडूमध्ये 5674 मेट्रिक टन, आंध्र प्रदेशात 4190 मेट्रीक टन, पंजाबमध्ये  225 मेट्रिक टन, केरळमध्ये 513 मे.टन, तेलंगणामध्ये 3366 मेट्रिक टन, झारखंडमध्ये 38 मेट्रिक टन आणि आसाममध्ये 560 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला आहे.

आतापर्यंत देशभरातील 15 राज्यांमधील सुमारे 39 शहरांमध्ये ऑक्सिजन एक्सप्रेसने एल.एम.ओ. पोहचवला आहे.

 

* * *

S.Tupe/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1728521) Visitor Counter : 163