ऊर्जा मंत्रालय
कर भरणा केल्यानंतरचा ‘पॉवरग्रिड’चा एकत्रित नफा 12,000 कोटींच्या वर
बोनस शेअर्स आणि अंतिम लाभांश देण्याची पॉवरग्रिड मंडळाची शिफारस
Posted On:
18 JUN 2021 3:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 जून 2021
ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीतील सार्वजनिक क्षेत्रातील केंद्रीय कंपनी, भारतीय पॉवर ग्रिड महामंडळ लिमिटेड (POWERGRID) ने 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाचा ताळेबंद जाहीर केला आहे. या महारत्न कंपनीने गेल्या आर्थिक वर्षात 40,824 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले असून कर वजा जाता 12,036 कोटी रुपयांचा एकत्रित नफा मिळवला आहे. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये या कंपनीच्या उत्पन्नात 6 % तर नफ्यात 9% ची वाढ झाली आहे.
या कंपनीने केवळ एकटीने 40,527 कोटी रुपयांचे उत्पन्न आणि कर वजा जाता 11,936 कोटी रुपये नफा मिळवला आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत कंपनीच्या उत्पन्नात 6% आणि नफ्यात 10% वाढ झाली आहे.
वित्तीय वर्ष 2020-21 मध्ये कंपनीला 11,284 रुपयांचा भांडवली खर्च आला आणि कंपनीकडे 21,467 कोटी रुपयांची एकत्रित भांडवली मालमत्ता होती. पॉवरग्रिडच्या एकूण स्थावर मालमत्तेचे एकत्रित मूल्य 31 मार्च 2021 रोजी 2,41,498 कोटी इतके होते. मार्च 2020 मध्ये हे मूल्य 2,27,543 कोटी इतके होते.
अत्याधुनिक व्यवस्थापन तंत्रज्ञान, स्वयंचलित साधने आणि डिजिटलीकरणामुळे, पॉवरग्रिडने आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये सरासरी पारेषण व्यवस्था उपलब्धता 99.76% राखण्यात यश मिळवले आहे.
पहिल्यांदाच, पॉवरग्रिड बोर्डाने कंपनीचे सामाईक समभाग , आपल्या समभागधारकांना 1:3 गुणोत्तराने बोनस समभाग म्हणून दिले आहेत.
त्यासोबतच, कंपनीने 30% (10 रुपये किमतीच्या समभागावर 3 रुपये) चा अंतिम लाभांश देण्याचा प्रस्तावही मांडला आहे. हा लाभांश पहिल्या आणि दुसऱ्या सरासरी 90 टक्के लाभांशांच्या व्यतिरिक्त देण्याचा प्रस्ताव आहे, आधीचे दोन्ही लाभांश 2020-21 मध्ये देण्यात आले आहेत. म्हणजेच वर्षाचा एकूण लाभांश प्रति समभाग 12 रुपये इतका असेल. गेल्यावर्षी तो प्रति समभाग 10 रुपये इतका होता.
आर्थिक वर्ष 2021 च्या अखेरीस, पॉवरग्रिडची आणि तिच्या उपकंपन्यांची एकूण पारेषण मालमत्ता पारेषण वाहिन्यांच्या 1,69,829 सीकेएम आणि पारेषण क्षमता 4,37,223 एमव्हीए इतकी होती. या दोन्हीमध्ये या आर्थिक वर्षात वार्षिक प्रमाणात अनुक्रमे चार आणि सात टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.
Jaydevi PS/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1728203)
Visitor Counter : 283