नागरी उड्डाण मंत्रालय

अपारंपारिक एरियल ऑब्जेक्ट (ड्रोन / यूएव्हीएस) उडवण्यास बंदी


Posted On: 16 JUN 2021 2:20PM by PIB Mumbai

मुंबई, 16 जून 2021

 

आर पी एएस (ड्रोन्स/यूएव्हीएस) यासह कोणतीही अपारंपरिक वस्तू आई एन एस हॅमला, मार्वे रोड, मालाड (पश्चिम), मुंबई 400095 च्या 03 कि.मी. अंतरावर उडवणे प्रतिबंधित आहे. आरपीए (ड्रोन / यूएव्ही) यासह कोणत्याही अपारंपरिक हवाई वस्तूंमध्ये या प्रतिबंधाचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास, कोणत्याही दायित्वाशिवाय त्यांचा नाश / जप्ती केली जाईल आणि ऑपरेटरविरूद्ध आयपीसीच्या कलम 121, 121ए, 287, 336, 337 आणि 338 अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते.

जर ड्रोन उड्डाण करणे आवश्यक असेल तर ऑपरेटर / एजन्सीने डिजी स्काय वेबसाइटद्वारे डायरेक्टर जनरल सिव्हिल एविएशन (डीजीसीए) कडून मान्यता घ्यावी आणि मंजुरी पत्राची प्रत नियोजित उड्डाण करण्याच्या ऑपरेशनच्या एक आठवड्यापूर्वी आई एन एस हॅमला, मार्वे रोड, मालाड (पश्चिम), मुंबई, 400095 येथे सादर करावी.
 

* * *

M.Chopade/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1727479) Visitor Counter : 151


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil