इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राच्या (एनआयसी) ई-मेल प्रणालीवर सायबर उल्लंघन होत नसल्याचे सरकारने केले स्पष्ट
Posted On:
13 JUN 2021 8:33PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 जून 2021
एअर इंडिया, बिग बास्केट आणि डोमिनोज यासारख्या संस्थांमधील डेटा उल्लंघनाच्या परिणामासंदर्भात काही प्रसारमाध्यमांवर असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे की, ज्यायोगे उल्लंघन करणाऱ्यांनी हॅकर्सना एनआयसीचे ईमेल खाती आणि सांकेतिक शब्द कळवले आहेत.
हे लक्षात घेता, प्रथम हे स्पष्ट करणे महत्वाचे आहे की, राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राने (एनआयसी) देखभाल केलेल्या भारत सरकारच्या ई-मेल सिस्टममध्ये सायबर माहितीचे उल्लंघन झालेले नाही. ई-मेल प्रणाली पूर्णपणे सुरक्षित आणि संरक्षित आहे.
दुसरे म्हणजे, जर शासकीय वापरकर्त्यांनी त्यांच्या शासकीय ई-मेल खात्याचा वापर करुन या पोर्टलवर नोंदणी केली नसेल आणि शासकीय ई-मेल खात्यात वापरलेल्या संकेतशब्दाचा वापर केला नसेल तर बाह्य पोर्टलवरील सायबर सुरक्षा उल्लंघनाचा परिणाम सरकारी ई-मेल सेवेच्या वापरकर्त्यांवर होणार नाही.
एनआयसी ई-मेल सिस्टमने आपल्या व्यवस्थेत द्विस्तरीय प्रमाणीकरण आणि 90 दिवसांत संकेत शब्द बदलणे यासारखे अनेक सुरक्षा उपाय ठेवले आहेत. याव्यतिरिक्त एनआयसी ई-मेलमधील संकेतशब्द बदलण्यासाठी मोबाइल ओटीपी आवश्यक आहे आणि जर मोबाइल ओटीपी चुकीचा असेल तर संकेतशब्द बदलणे शक्य होणार नाही. एनआयसी ई-मेल वापरुन फिशिंग करण्याचा कोणताही प्रयत्न एनआयसीद्वारे रद्द केला जाऊ शकतो, याशिवाय एनआयसी वेळोवेळी वापरकर्ता जागरूकता मोहीमादेखील आयोजित करते आणि संभाव्य जोखीम आणि सुरक्षितता मापदंडांसंदर्भात वापरकर्त्यांना अद्ययावत करत असते.
* * *
S.Thakur/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1726829)
Visitor Counter : 274