आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड -19 प्रतिबंधक लसीकरण ताजी माहिती
कोविड प्रतिबंधक लसीच्या 26 कोटींहून अधिक मात्रांचा राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांना विनामूल्य पुरवठा
लसीकरणासाठी 1.53 कोटींहून अधिक मात्रा अद्याप राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांकडे उपलब्ध
प्रविष्टि तिथि:
13 JUN 2021 11:15AM by PIB Mumbai
देशव्यापी लसीकरण मोहिमेचा एक भाग म्हणून, भारत सरकार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोविड प्रतिबंधक लसीचा विनामूल्य पुरवठा करून सहकार्य करत आहे. याव्यतिरिक्त, भारत सरकार ,राज्ये / केंद्रशासित प्रदेशांना लसीच्या थेट खरेदीसाठी साहाय्य करत आहे. चाचणी, देखरेख , उपचार आणि कोविड प्रतिबंधासाठी योग्य वर्तन यासोबत महामारीच्या नियंत्रणासाठी आणि व्यवस्थापनासाठी लसीकरण हा भारत सरकारच्या व्यापक धोरणाचा अविभाज्य स्तंभ आहे
कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाच्या मुक्त आणि गतिमान तिसऱ्या टप्याच्या धोरणाची अंमलबजावणी 1 मे, 2021 पासून सुरु झाली.
या धोरणाअंतर्गत, प्रत्येक महिन्यात केंद्रीय औषध प्रयोगशाळेने (सीडीएल) मान्यता दिलेल्या कोणत्याही उत्पादकाच्या 50 टक्के लसीच्या मात्रा केंद्र सरकार खरेदी करेल. पूर्वीप्रमाणेच राज्य सरकारांना या मात्रा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जातील.
राज्य सरकारे / केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत 26 कोटी (26,64,84,350) पेक्षा जास्त लसीच्या मात्रा भारत सरकारमार्फत (विनामूल्य ) आणि राज्यांकडून थेट खरेदी अशा दोन्ही श्रेणीतून उपलब्ध करून दिल्या आहेत
आज सकाळी 8 वाजेपर्यंत उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, वाया गेलेल्या मात्रांसह एकूण 25,12,66,637 मात्रा देण्यात आल्या आहेत.
राज्य/केंद्रशासित प्रदेशांकडे अजूनही 1.53 कोटींपेक्षा अधिक (1,53,79,233) मात्रांचा साठा उपलब्ध आहे.
याव्यतिरिक्त , आगामी 3 दिवसांमध्ये 4 लाखांपेक्षा अधिक (4,48,760) लसीच्या मात्रा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना उपलब्ध होणार आहेत.
***
MC/SC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1726744)
आगंतुक पटल : 257
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada