विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

बंगालच्या उपसागरावरच्या चक्रीवादळाची उपग्रहाच्या आधी सूचना मिळण्यासाठी मदत करणारे अभिनव तंत्रज्ञान

Posted On: 09 JUN 2021 8:42AM by PIB Mumbai

उत्तर हिंदी महासागर क्षेत्रात, महासागराच्या पृष्ठभागावर वातावरणात निर्माण होणाऱ्या किंवा अधिक तीव्र होणाऱ्या चक्रीवादळांची, उपग्रहाआधीच पूर्वसूचना देणारे आश्वासक तंत्रज्ञान भारतीय संशोधकांना प्राप्त झाले आहे.

नुकसान टाळण्याच्या दृष्टीने चक्रीवादळाच्या  पूर्व सूचनेचा  व्यापक  सामाजिक-आर्थिक प्रभाव राहतो. आतापर्यंत दूर संवेदक तंत्रज्ञानाद्वारे याची लवकर सूचना मिळत होती. मात्र महासागराच्या उष्ण पृष्ठभागावर लक्षणीय कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतरच या संदर्भातली सूचना शक्य होत असे. चक्रीवादळाची सूचना आणि त्याचा प्रभाव  यामध्ये मोठा काळ राहिल्यास त्याचा उपयोग  वादळाच्या सज्जतेसाठी होतो.

जिया अल्बर्ट,बिश्नुप्रिया साहू,प्रसाद के भास्करन यांचा समावेश असलेल्या चमूने, केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सहकार्याने, हवामान बदल कार्यक्रमाअंतर्गत, एडी शोध तंत्रज्ञानाचा उपयोग करत अनोखी पद्धत शोधून काढली आहे, ज्यामुळे उत्तर हिंदी महासागरात निर्माण होणारा  कमी दाबाचा पट्टा , याची निर्माण होण्याच्या स्थितीत असतानाच माहिती मिळू शकते. एटमोस्फीयरिक रिसर्च या मासिकात हे संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे.

 

वातावरणात निर्माण होणारी चक्रीवादळ पूर्व स्थिती ओळखण्यासाठी ही पद्धत विकसित करण्यात आली आहे.यासाठी  उत्तर हिंदी महासागरात मान्सून नंतर विकसित झालेल्या फालीन(2013), वरदाह(2013), गज (2018), मदी (2013), आणि मान्सून पूर्व, मोरा (2017) आणि ऐला(2009) या चक्री वादळांचा अभ्यास करण्यात आला आहे.

या पद्धतीद्वारे मान्सून पूर्व आणि मान्सून नन्तर विकसित होणाऱ्या चक्रीवादळासाठी किमान चार दिवस (~ 90 h) आधीच अंदाज लावता येऊ शकतो.

वातावरणात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याच्या सुरवातीला त्याची माहिती देण्याची या तंत्रज्ञानाची क्षमता असून याद्वारे उपग्रहाआधी माहिती मिळू शकते.  

***

Jaydevi PS/NC/CY

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1725558) Visitor Counter : 239