गृह मंत्रालय
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातमधील वल्लभ युवा संघटनेने उभारलेल्या नऊ ऑक्सिजन उत्पादन संयंत्रांचे केले आभासी उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
03 JUN 2021 8:07PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 जून 2021
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज गुजरातमधील वल्लभ युवा संघटनेने (व्हीवायओ) स्थापना केलेल्या नऊ ऑक्सिजन उत्पादन संयंत्रांचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले आणि व्हीवायओच्या मानवतावादी कार्याबद्दल त्यांची प्रशंसा केली. या कार्यक्रमाला वल्लभ युवा संघटनेचे प्रमुख, विश्वगुरू श्री व्रजराजकुमार महाराज जी, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. आपल्या भाषणात, अमित शहा म्हणाले की कोविड -19च्या दुसऱ्या लाटेत , विषाणूने आपल्या रूपात फार लवकर वेगाने परिवर्तन करण्यास सुरवात केली आणि याचा लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम झाला. ते म्हणाले की, आपण अगदी थोड्या दिवसात त्यावर नियंत्रण आणण्यात आणि रुग्णसंख्येचा आलेख उतरत्या दिशेला आणण्यात सामूहिक यश मिळवले. केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, जर आपण विश्लेषण केले तर जगातील विकसित देशांमध्येही यंत्रणा कोलमडत असल्याचे दिसून आले मात्र येथे भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वात आपण कोरोना विरोधात लढा दिला.
अधिक माहितीसाठी कृपया येथे क्लिक करा




M.Chopade/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1724178)
आगंतुक पटल : 215